Breaking
ब्रेकिंग

जिजामाता शाळा परांडा येथे नशा मुक्त भारत व सशक्त भारत अभियान संपन्न:- ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन

0 8 9 6 7 5

जिजामाता शाळा परांडा येथे नशा मुक्त भारत व सशक्त भारत अभियान संपन्न:- ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन

प्रतिनिधी: बंटी शिंदे

परांडा: दि. १८/ देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात सेवा संकल्प अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सोलापूर आणि कै. वनमला बबनराव वैद्य बहुउद्देशीय सामाजिक फाउंडेशन, करमाळा, जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती अभियान सुरू आहे. याच मालिकेतील एक महत्वपूर्ण कार्यक्रम काल परांडा तालुका येथील सुप्रसिद्ध व नावाजलेली जिजामाता प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी शाळेतील ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. सकाळच्या सत्रात शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी एका रांगेत शिस्तबद्ध उभे राहून या अभियानात सामील झाले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परांडा तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सुपरिचित व्यक्तिमत्व माननीय प्रकाश जी पाटील सर उपस्थित होते. तर या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक, प्रणेते आणि नशा मुक्त भारत अभियानाचे सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसेडर तथा सशक्त भारत अभियानाचे मुख्य प्रशिक्षक श्री. महेश बबनराव वैद्य हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात झाली. शाळेच्या वतीने प्रमुख पाहुणे प्रकाश जी पाटील सर आणि प्रमुख मार्गदर्शक ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. पाटील सर यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारे मार्गदर्शन केले. मित्रांनो, २०४७ साली आपल्या भारताला जगातील नंबर एकचा विकसित भारत बनायचा आहे. पण हा विकसित भारत केवळ इमारतींनी किंवा रस्त्यांनी नाही, तर नशा मुक्त तरुणांनी आणि सशक्त समाजाने बनणार आहे. आज मोबाईल, गुटखा, तंबाखू, सिगारेट आणि चुकीच्या संगतीचे व्यसन आपल्या तरुणाईला पोखरत आहे. म्हणूनच मी आणि माझे कै. वनमला बबनराव वैद्य फाउंडेशनने २०४७ साठी नशा मुक्त ग्राम आणि सशक्त ग्राम ही संकल्पना मांडली आहे असे यावेळी बोलताना महेश वैद्य यांनी सांगितले. पुढे बोलताना महेश वैद्य म्हणाले या संकल्पनेनुसार आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, प्रत्येक कॉलेज, प्रत्येक वस्ती आणि प्रत्येक गावात जाऊन समाजातील सर्व घटकांना विद्यार्थी, शिक्षक, पालक, युवक यांना एकत्रित करून विकसित भारतासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची खूप गरज आहे. तुम्ही आज शपथ घ्या की, आम्ही स्वतः व्यसनापासून दूर राहू आणि दुसऱ्यालाही दूर ठेवू. त्यांच्या या रोखठोक आणि प्रेरणादायी भाषणाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

या संपूर्ण कार्यक्रमाचा सर्वात आकर्षक आणि प्रेरणादायी भाग म्हणजे सशक्त भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेले व्यायामाचे सत्र. महेश वैद्य यांनी स्वतः सर्व ३०० विद्यार्थी – विद्यार्थिनींना शाळेच्या मैदानावर रांगेत उभे करून, शास्त्रशुद्ध व्यायाम पद्धतीने प्रत्यक्ष कृतीद्वारे व्यायाम करून घेतला. यामध्ये सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग, जागेवर धावणे, हात-पायांचे व्यायाम असे विविध प्रकार त्यांनी करून दाखवले आणि विद्यार्थ्यांकडून करून घेतले. केवळ भाषण नाही तर कृतीतून शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केल्यास अभ्यासात लक्ष कसे लागते आणि मन निरोगी कसे राहते हे महेश वैद्यह त्यांनी पटवून दिले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ देण्यात आली.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. घाडगे सर म्हणाले, अशा प्रकारचे अभियान आज सर्वत्र होणे खूप गरजेचे आहे. हे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर समाजातील सर्व घटकांसाठी आणि विशेष करून युथ जनरेशनसाठी खूप महत्त्वाचे आहे. महेश वैद्य जे काम करतात ते फक्त काम नाही तर एक तपश्चर्या आहे. त्यांचे हे कार्य विद्यार्थ्यांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी खूप महत्त्वाचे आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी आज जो प्रत्यक्ष व्यायामाचा उपक्रम घेतला, तो आमच्या विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहील. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे घाडगे सर हे स्वतः एक उत्कृष्ट खो-खो खेळाडू आणि व्यायाम पटू आहेत, त्यामुळे त्यांना या अभियानाचे महत्व अधिक चांगले समजते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रम अतिशय उत्साहात, शिस्तीत आणि सकारात्मक उर्जेत पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे