Breaking
ब्रेकिंग

अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सहविचार सभा संपन्न

0 3 9 0 3 0

अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सहविचार सभा संपन्न

( संदर्भ :- राज्य मंडळाचे पत्र क्र.रा.मं/ परीक्षा-8/ 193 दि. 17-01-2005. )

प्रतिनिधी :- पंकज पाटील

पुणे- आज दि. 24-01-2025 शुक्रवार रोजी दुपारी ठिक. 11:30 वाजता मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे पदाधिकारी व राज्य मंडळ, पुणे यांची दहावी/बारावी परीक्षा केंद्रावरील केंद्रसंचालक, केंद्रातील कर्मचारी व पर्यवेक्षक बदला संदर्भात* सहविचार सभा घेण्यात आली यासभेसाठी राज्य मंडळाचे अध्यक्ष मा.श्री शरद गोसावी, सचिव मा.श्री देवीदास कुलाळ मुख्याध्यापक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री रावसाहेब आवारी (दादा), राज्य अध्यक्ष मा. श्री. के. एस. ढोमसे, राज्य उपाध्यक्ष मा. श्री नंदकुमार बारवकर, राज्य उपाध्यक्ष मा.श्री. शत्रुध्न बिरकड, राज्य उपाध्यक्ष मा.श्री प्रकाश देशमुख, राज्य सचिव मा. श्री अशोक मोरे, मार्गदर्शक मा. श्री वसंत पाटील, माजी सचिव मा. श्री मोतीभाऊ केंद्रे मराठवाड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय शिप्परकर, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री यशवंत गजभारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री डी.पी.कदम, पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.श्री एस. बी. देशमुख, विदर्भ अध्यक्ष मा.श्री सतिश जगताप, विदर्भ सचिव मा.श्री.विलास भारसाकळे, मा.श्री खंडेराव जगदाळे, राज्य सदस्य मा.श्री फुलवळे श्री. पंकज घोलप इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

@सहविचार सभेमध्ये खालील विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.@

1)केंद्रसंचालक, केंद्रातील कर्मचारी यांना स्वतःच्या केंद्राऐवजी दुसऱ्या केंद्रावर पाठवण्याचा घेतलेला निर्णय रद् करणे बाबत. :- याविषयावर बैठकीमध्ये या विषयावर सखोल चर्चा होवून येत्या एक-दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे अध्यक्षांच्या वतीने सांगितले.
2)परीक्षक व नियामक यांच्या मानधनात वाढ करणे बाबत. :- याविषयावर या बैठकीमध्ये चर्चा होवून पुढील प्रमाणे मानधन वाढ ठरवण्यात आले. परीक्षक :- 1) 5 रुपये चे 6.50 रुपये 2) 4 रुपये चे 5 रुपये 3) 3 रुपये ये 4 रुपये *मुख्य नियामक* :- 3000 रुपये चे 4000 रुपये *नियामक* 1) 1.75 रुपये चे 2.25 रुपये 2) 1.50 रुपये चे 2 रुपये 3) 1. 25 चे 1. 75 रुपये.
जुलै परीक्षेसाठी किमान 1) 300 रुपये चे 350 रुपये 2) 250 रुपये चे 300 रुपये.
3) परीक्षक व नियामक यांची संख्या वाढवणे बाबत. :- अनुदानित, स्वयअर्थ साहित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यम यांच्यातून परीक्षक व नियामक घेवून संख्या वाढवली जाईल असे ठरले.
4) प्रत्येक विषयासाठी परीक्षकास जास्तीत जास्त 200 तर नियामकास जास्तीत जास्त 1000 उत्तरपत्रीका तपासण्यासाठी देणे बाबत. :- यापेक्षा जास्त संख्या दिली जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना विभागीय मंडळास देण्यात येतील असे ठरले.
5) सातत्याने परीक्षक अथवा नियामक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकास सवलत देवून आतापर्यंत उपरोक्त दोन्ही कामे न केलेल्या शिक्षकांना कामे देणे बाबत. :- ज्यांनी अध्याप काम केले नाही त्या सर्वांची माहिती संकलीत करून त्यांना कामे देण्यात येतील असे ठरले.
6) एकाच शिक्षकाची एकापेक्षा अधिक विषयासाठी परीक्षक म्हणून नेमणूक न करणे बाबत. :- अशी माहिती संकलीत करून एकच विषयासाठी नेमणूक करण्यात येईल असे ठरले.
7) केंद्रसंचालक, केंद्रातील कर्मचारी व पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ करणे बाबत. :- फेब्रुवारी 2026 च्या परीक्षेपासून मानधन वाढ केली जाईल असे ठरले.
8)*वाढीव विषयास प्रलंबीत मंडळ मान्यता संदर्भात लागत असलेल्या दंडा बाबत. :- या संदर्भात माहिती संकलीत करून निर्णय घेण्यात येईल असे ठरले.
9) मुख्याध्यापक यांच्यावर असलेल्या विविध कामाचा भार लक्षात घेता त्यांना परीक्षक व नियामक कामातून वगळणे बाबत. :- याविषयावर चर्चा होवून केंद्रसंचालक यांना पेपर देण्यात येणार नाहीत व उर्वरीत मुख्याध्यापकांन साठी परीक्षकांची व नियामकाची संख्या संकलीत करून निर्णय घेण्यात येईल.
10)शिक्षण संक्रमण अंक शाळांना नियमितपणे पुरविण्या बाबत. :- सर्व शाळांना पोहचतील याची काळजी घेण्यात येईल.
11) *ऐनवेळचे विषय*
@ कायम मंडळ मान्यता : दि. 31.1.2024 रोजी मुख्याध्यापक संयुक्त महामंडळा सोबत झालेल्या सहविचार सभेमध्ये ठरल्या प्रमाणे सर्व विभागाय मंडळास कायम मंडळ मान्यता देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांची कायम मंडळ मान्यते साठी शिफारस नसेल तरी देखील विभागीय मंडळ अधिकची फिस आकारून कायम मंडळमान्यता देण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.
इतर अनेक विषयावर या सहविचार सभेमध्ये चर्चा होवून बैठक अत्यंत सकारात्मक पार पडली. सभेचे आभार राज्य अध्यक्ष के. एस. ढोमसे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे