दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या प्रचारार्थ भाजपचे ग्राम विकास पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री गणेश काका जगताप यांचा गावं भेट दौर्याचे आयोजन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ९/ करमाळा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे पंचायत राज व ग्राम विकास विभाग पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री गणेश काका जगताप यांचा दौरा दिनांक १२/११/२०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी भाजपा व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजप पंचायत राज व ग्राम विकास विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री निनाद पटवर्धन यांनी केले आहे.
पुढे बोलताना श्री पटवर्धन म्हणाले की, शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय भैय्या बागल यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी कामाला लागले असून करमाळा तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींनी आपले तरुण तडफदार युवा नेते व महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय भैय्या बागल यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असेही आवाहन केले. तसेच करमाळा विधानसभा मतदार संघात पंचायत राज व ग्रामविकास विभाग पश्चिम महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष यांचे गाव भेट दौरे आयोजित केले आहेत अशीही माहिती श्री निनाद यांनी दिली.