Breaking
ब्रेकिंग

राहुरीत मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक

0 3 9 0 4 0

राहुरीत मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक

राहुरी जावेद शेख

राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर I 416/2025 BNS 303(2) प्रमाणे दिनांक 16/4 /25 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये गुन्हयातील फिर्यादी यांचा 15000/- रुपये किमतीचा विप्रो कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत दिले फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने राहुरी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवून तांत्रिक माहितीच्या आधारे श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने तात्काळ आरोपी नामे 1) शाहरुख अफसर शेख वय 32 वर्ष व गणेश बाबासाहेब मुंडे दोघे राहणार श्रीरामपूर यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक 21/ 04/ 25 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, सपोनि पवार ,पोहेकॉ सतीश आवारे, ,पोहेकॉ जायभाये , hc सुरज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल ताजणे, रवी पवार, psi मेढे, pc पटारे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी केलेलाआहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहे कॉ आवारे हे करत आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे