वरवंडी, बाभुळगाव परीसरात गहू काढणी साठी हार्वेस्टरला पसंती . . .
शेतक-यांनी गहू काढणीला घेतला वेग

वरवंडी, बाभुळगाव परीसरात गहू काढणी साठी हार्वेस्टरला पसंती . . .
शेतक-यांनी गहू काढणीला घेतला वेग
राहुरी वृत्तसेवा : जावेद शेख
राहुरी तालुक्यातील वरवंडी व बाभुळगाव लगतच्या धामोरी,खंडाबे, नांदगाव,सडे,इत्यादी शेतशिवारात शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली . दहा ते पंधरादिवसा पासून या भागात गहू काढणी साठी मजूर वर्ग मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हार्वेस्टरला पसंती दिली आहे . एकरी पंधरासे सोळाशे रु भावाने गहू काढणी साठी शेतकरी एजंटामार्फत देऊन गहू काढणी करीत आहे . मात्र शेतकऱ्याचा गहू बाजारात येताच तीन हजार रुपय प्रती क्टिंटलचा गहू २३०० ते २५००रु. पर्यन्त बाजार भावावर आला आहे . मार्च महीन्यात शेतकऱ्यांना बँकाचे देणे असल्याने बाजारात गहू हरभरा सोयाबीन तुर सर्वच वानाचे भाव गडगडल्याने शेतकरी नैराश्यात आहे . शासनाने भावांतर द्यावे अशी मागणी करीत शेतकऱ्यांकडू होत आहे .