अहिल्यानगर येथे बच्चू भाऊ यांच्या उपस्थितीत दिव्यांग मार्गदर्शन मेळावा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे: मधुकर घाडगे*
अहिल्यानगर येथे बच्चू भाऊ यांच्या उपस्थितीत दिव्यांग मार्गदर्शन मेळावा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे: मधुकर घाडगे
राहुरी तालुका जावेद शेख
राज्यातील शेतकरी, शेतमजूर, मच्छिमार मेंढपाळ दिव्यांग बांधव यांच्यासाठी आवाज उठवणारे माजी मंत्री प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात हक्कयात्रा चालू असून त्या अंतर्गत दिव्यांग बांधवांचा मार्गदर्शन मेळावा सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत प्रहार करिअर अकॅडमी एन आर लॉन्स शेजारी वारूळवाडी अहिल्यानगर संभाजीनगर हायवे अहिल्यानगर येथे दिव्यांगांना 6000 पेन्शन यासह मागण्यासाठी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांच्या अडचणी समजून घेण्यासाठी राज्यव्यापी हक्कयात्रा च्या माध्यमातून दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.
बच्चू कडू यांनी गेल्या वीस वर्षापासून दिव्यांगासाठी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. रायगड येथे तीन दिवसाचं अमरण उपोषण केलं त्यानंतर अमरावती मोझरी या ठिकाणी सात दिवसाचा आमरण उपोषण केलं त्यातच फलित म्हणून दिव्यांग पेन्शन ही 1500 वरून 2500 या सरकारने वाढवले त्याचे पूर्ण श्रेय बच्चुभाऊंना जातं. दिव्यांग मार्गदर्शन मेळाव्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव साहेब, उपराज्याध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब, प्रहार संघटनेचे प्रवक्ते तथा मेरा धरती सुरज परिवार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषभाऊ पवार साहेब जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मेजर विनोद सिंग परदेशी साहेब.उत्तरचे युवा जिल्हाध्यक्ष अँड.पांडुरंग अवताडे महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कासार जिल्हा सचिव हमीद शेख जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख जिल्हा समन्वय आप्पासाहेब ढोकणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत तरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी हजारोच्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित रहावे.



