रविवार १८ ऑक्टोबर रोजी ‘आनेवाला पल’ गीतांची मैफिलीचे आयोजन


रविवार १८ ऑक्टोबर रोजी ‘आनेवाला पल’ गीतांची मैफिलीचे आयोजन
नगर : जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या सुरेल आठवणींना उजाळा देणारा ‘गाता रहे मेरा दिल ग्रुप तर्फे अमीन धारानी प्रस्तुत ‘आनेवाला पल’ हा संगीतमय गीतांची मैफलीचे रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोफेसर कॉलनी चौक येथील रोज गोल्ड हॉल शिंगवी ज्वेलर्स च्या खाली सावेडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात निलेश गाडेकर, धनंजय आरडे, दीप भालेराव, मुकुंद ढोले, संदीप सोनसळे, मयुरी ढोले, सुनील भंडारी, जयंत पाठक, राजेश आरे, वृषाल एकबोटे, मुकेश कुलथे, डॉ. संजय वायकर, माधवी गुजर, मीनानाथ मैड, चारू ससाने, डॉ.विवेकानंद कंगे, मंगेश भुते,बालाजी गंगेकर, अमिन धारानी हे कलाकार गीते सादर करणार आहे.
जुन्या हिंदी चित्रपटांतील सदाबहार गीतांचा आनंद रसिकांना घेता यावा आणि संगीताच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सुरेल गीतांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक अमीन धारणी यांनी केले आहे .



