Breaking
ब्रेकिंग

“राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार सोहळा”

0 7 6 9 4 9

“राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार सोहळा”

प्रतिनिधी पुणे सुनिल ज्ञानदेव भोसले

राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार समिती आणि ट्रॅव्हएक्स्पर्ट डेस्टिनेशन्स यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना “राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार दिले जातात. यंदाचा पुरस्कार बाली, इंडोनेशिया येथील गांधी पुरी आश्रमचे ‘पद्मश्री अगुस इंद्रा उडायाना ‘ यांना जाहिर करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी व एअरमार्शल अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे किसन भोसले हे असणार आहेत. या कार्यक्रमास महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड, तासगावचे आमदार रोहित आर आर पाटील, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक प्रदीप (बाबा) धुमाळ, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एम इ डी सी चे उपाध्यक्ष सचिन इटकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, मनसेचे सरचिटणीस अॅड. किशोर शिंदे, लेखक व दिग्दर्शक धनंजय भावलेकर, हॉटेल समृद्धीचे अरविंद चव्हाण, प्राज इंडस्ट्रीचे राजेंद्र मोरे, चित्रपट दिग्दर्शक सागर वंजारी,, माजी नगरसेविका अनिता कदम, दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे संचालक शिवराज सावंत, पोलादपूरचे शिवसेना संपर्कप्रमुख शैलेंद्र उत्तेकर, कॅ. जगदीश जोशी, राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार समितीचे सदस्य अॅड. शशांक पाटील, अभिनेते किरण माने, माजी नगरसेविका अश्विनी जाधव, यांच्यासह के. पी. जगताप, पी. टी. जगदाळे, राजू कदम, शंकर खरोसे, गणेश जाधव, सचिन पांडुळे, नेहा ढमाले, सुरेश सकपाळ, अंकुश घोलप, सुनिल पवार, रुपेश पार्टे, सचिन पार्टे, ज्ञानेश्वर खरोसे, कपिल घोलप, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शेवराई भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता कोथरूड येथील गांधी भवन हॉलमध्ये होणार आहे. आयोजक श्री.राहुल भरत शेलार व सौ माधवी राहुल शेलार

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे