Breaking
ब्रेकिंग

कुर्डुस जिल्हापरिषद मतदार संघात शिवसेनेचा बोलबाला

जिल्हाप्रमुख राजा केणी ह्यांचे नेतृत्वात कुर्डुस मतदार संघात भगवा फडकणार

0 3 9 0 2 1

कुर्डुस जिल्हापरिषद मतदार संघात शिवसेनेचा बोलबाला

जिल्हाप्रमुख राजा केणी ह्यांचे नेतृत्वात कुर्डुस मतदार संघात भगवा फडकणार

प्रतिनिधी :   राजेश बाष्टे

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमात विरोधकांचा सुफडा साफ करणारा निकाल समग्र महाराष्ट्राने पाहिला परंतु विरोधक त्यांचा झालेला पराभव खिलाडू वृत्तीने मान्य न करता निवडणूक यंत्रणा ना दोषी धरताना दिसत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अलिबाग १९२ विधानसभा मतदार संघात महेंद्र दळवी हे तब्बल २९७०३ एवढ्या भरघोस मताधीक्यानी निवडून येत अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मदर संघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्याचा इतिहास रचला.

जिल्हाप्रमुख राजा केणी ह्यांचे कार्यावर प्रभावित होऊन त्यांचे नेतृत्वाखाली विभागातील व समग्र मतदार संघातील तरुण, वयोवृद्ध, महिला वर्गाने शिवसेनेचा भगवा झेंडा हाती धरला. शेकाप चा बालेकिल्ला समजला जाणारा अलिबाग तालुक्यातील कुर्डुस मतदार संघात तर शेकाप ची त्रेधा तिरपीट उडताना दिसली.शेकाप च्या काळात हया मतदार संघावर शेकाप चा प्रभाव व पकड होती, त्यावेळी मतदारांनी शेकाप ला आघाडी दिली होती. परंतु *२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज केणी ह्यांचे नेतृत्वात शिवसेनेने शेकाप ची मागील लीड तोडून तब्बल १७०० मतांची लीड घेत महायुतीचे खासदार सुनील तटकरे ह्यांना विजय मिळवून दिला होता, त्यातच ह्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण २८९४ मतांची लीड कुर्डुस मतदारसंघाने महायुती व शिवसेनेला दिली.

शेकाप चे पारंपरिक असलेले मतदारसंघात मतदारांनी सुद्धा महायुती व शिवसेनेला मतदान केले असल्यामुळे असून ह्या मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व दिसत आहे.
निवडणूक आयोग येत्या २ महिन्यात म्हणजे फेब्रुवारी व मार्च २०२५मध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणूक कार्यक्रम राबवणार असल्याने जिल्हाप्रमुख राजा केणी ह्यांनी कुर्डुस मतदार संघात केलेला विकास आणि तळागाळातील नागरिकांसोबत असलेला दांडगा लोकसंपर्क ह्यामुळे कुर्डुस जिल्हापरिषद मतदार संघ तसेच पंचायत समिती गणात शिवसेनाच आपला विजय निश्चित करेल असा विश्वास जिल्हाप्रमुख राजा केणी ह्यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे