Breaking
ब्रेकिंग

वंचितांना आधार देणाऱ्या कार्याचा सन्मान; डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

0 8 9 6 7 5

वंचितांना आधार देणाऱ्या कार्याचा सन्मान; डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

ब्रिगेडिअर राजीव चावला यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान; स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या उपक्रमांची दखल

 

अहिल्यानगर – सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा दिव्य दृष्टी फौंडेशन आणि शोभा सर्वोदय फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ब्रिगेडिअर राजीव चावला यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

डॉ. शिंदे हे स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या माध्यमातून रक्तदान, आरोग्यसेवा, शैक्षणिक मदत, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण तसेच गरजू, अनाथ आणि दिव्यांग व्यक्तींना मदत अशा विविध उपक्रमांत सक्रिय योगदान देत आहेत. समाजातील वंचित घटकांना आधार देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. यावेळी धनश्री विखे पाटील, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ डाक अधीक्षक विकास पालवे, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, हरजितसिंघ वधवा आणि दिव्य दृष्टी फौंडेशनचे कृष्णा तवले आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानाला उत्तर देताना डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवण्यातच सामाजिक कार्याचा खरा आनंद आहे. वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे आणि युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवणे, हे आमच्या कार्याचे उद्दिष्ट आहे. हा सन्मान माझा वैयक्तिक नसून स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. या गौरवामुळे सामाजिक क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे