भारतीय बौद्ध महासभेची श्रीगोंदा तालुका कार्यकारणी जाहीर

भारतीय बौद्ध महासभेची श्रीगोंदा तालुका कार्यकारणी जाहीर
श्रीगोंदा प्रतिनिधी – आदेश उबाळे
भारतीय बौद्ध महासभेची श्रीगोंदा तालुका कार्यकारणी जाहीर . श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जेतवन बुद्ध विहारांमध्ये अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा सरचिटणीस सतीश ओहोळ कोषाध्यक्ष विजय हुसळे , उपाध्यक्ष भगवंत गायकवाड, किशोर कांबळे, गोरख केदारे, बलभीम जावळे या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित श्रीगोंदा तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उपाध्यक्ष अनिल उबाळे हे होते
श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी शांताराम उबाळे, सरचिटणीसपदी आबासाहेब राजपूत , राष्ट्र भूषण घोडके (कोषाध्यक्ष), नवनाथ रामफळे (कार्यालयीन सचिव), सचिन जगदाळे (हिशोब तपासणीस ), भारत आल्हाट ( संस्कार उपाध्यक्ष), गोरक्ष ओहोळ (प्रचार पर्यटन उपाध्यक्ष), पंडित कांबळे (संरक्षण उपाध्यक्ष), हर्षल अडबडले , प्रमोद जाधव (संस्कार सचिव) शांताराम थोरात , संतोष पठारे ( संरक्षण सचिव ) सोमनाथ पवार , अनिल उबाळे ( प्रचार सचिव), अमोल कांबळे, ज्ञानेश्वर डाळींबे, राहुल छत्तीसे, महेश पवार, दादाभाऊ पंडित ( संघटक ) अशी नियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनियुक्त कार्यकारणीचे श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव बनसुडे , सरचिटणीस अमोल झेंडे. भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा संघटक साधना ओहोळ, केंद्रीय शिक्षक प्रशांत चव्हाण सर इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
” बहुजन समाजातील सर्व घटकांना बरोबरीने घेऊन भारतीय बौद्ध महासभा ही लोकचळवळ करणार ” .
आयु. शांताराम उबाळे
( नवनियुक्त श्रीगोंदा तालुकाध्यक्ष , भारतीय बौद्ध महासभा )