Breaking
ब्रेकिंग

ग्रामीण पत्रकार संघटना आणि नमो संस्थेच्या वतीने ‘बालघर’ येथील मुलांना फराळ वाटप संपन्न

शिक्षणाबरोबरच आरोग्याकडे लक्ष दया - शिरिष बेगडे

0 7 6 9 3 4

ग्रामीण पत्रकार संघटना आणि नमो संस्थेच्या वतीने ‘बालघर’ येथील मुलांना फराळ वाटप संपन्न

शिक्षणाबरोबरच आरोग्याकडे लक्ष दया – शिरिष बेगडे

प्रतिनिधी : आसावरी वायकर

अहिल्यानगर : ग्रामीण पत्रकार संघटना आणि नमो बहुउद्देशीय संस्था , अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिपावलीचे औचित्य साधुन दि . १३ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त पी आय श्री . शिरीष बेगडे साहेब यांच्या हस्ते तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले . यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता .
बालघर प्रकल्पाचे संचालक श्री . युवराज गुंड हे येथील मुलांसाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत .

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले  पी . आय .शिरीष बेगडे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुम्ही आरोग्याची काळजी घ्या . शिक्षण पूर्ण करा . तुम्हाला पुढे भविष्यात काय व्हायचे आहे ते अगोदर ठरवा आणि त्यानुसार शिक्षण घेवून पुढे जा . मुलांना अतिशय सुंदररित्या उत्कृष्ठ मार्गदर्शन करून दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या .

ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव आणि नमो फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय वायकर, सामाजिक कार्यकर्त्या संस्थेच्या सचिव पूनम कानडे तसेच एस डब्ल्यु न्यूजच्या पत्रकार पौर्णिमा कोमाकूल यांनीही मुलांना मार्गदर्शन केले . पत्रकार प्रविण देशमुख यांनीही मोलाचे सहकार्य केले .

यावेळी नंदा शिंदे , गुरुदत्त शिंदे , अशोक शिंदे , ग्रामीण पत्रकार संघटनेचे पत्रकार आणि नमो फाऊंडेशन चे सर्व सदस्य उपस्थित होते .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे