Breaking
ब्रेकिंग

पाडळसरे धरण प्रकल्पाला PIB कडून ₹८५९ कोटींची ऐतिहासिक मान्यता*

0 4 0 3 8 3

*पाडळसरे धरण प्रकल्पाला PIB कडून ₹८५९ कोटींची ऐतिहासिक मान्यता*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- जळगांव व धुळे जिल्ह्यातील सिंचन विकासाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल आजचा दिवस जळगांव व धुळे जिल्ह्यातील  शेतकऱ्यांसाठी अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी आहे. पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड (PIB), नवी दिल्ली येथील महत्त्वपूर्ण बैठकीत निम्न तापी (पाडळसरे) सिंचन प्रकल्पास ₹८५९ कोटींची केंद्र पुरस्कृत आर्थिक मदत मंजूर झाली आहे.
           या प्रकल्पाचा ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ (PMKSY) अंतर्गत समावेश करण्यात आलेला असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या ठोस पाठपुराव्यामुळे आणि सहकार्यातून या प्रकल्पाला गती मिळाली आहे.
या प्रकल्पाचे फायदे आणि सामाजिक परिणाम:
शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होणार — पावसावर अवलंबून असलेली शेती आता जलसिंचनाच्या माध्यमातून सक्षम होईल.
            जळगाव जिल्ह्यातील चोपडा, धरणगाव, अमळनेर, यावल, पारोळा या तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.पाण्याची उपलब्धता वाढल्याने दुष्काळसदृश परिस्थितीवर नियंत्रण येईल.शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, उत्पादनाचा दर्जा आणि उत्पन्नाचे स्थैर्य निर्माण होईल.जलसंधारण, भूजल पातळी वाढ, पर्यावरण रक्षण यासारख्या क्षेत्रांनाही चालना मिळेल.जनतेच्या हितासाठी घेतलेला निर्णय – भविष्य घडविण्याचे औषध या निर्णयामुळे केवळ निधी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या संघर्षाला दिलेले समाधान, त्यांच्या कष्टाला मिळालेला आधार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेली चालना आहे.
           हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे, आणि विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे. हा निर्णय म्हणजे जलक्रांतीची सुरुवात आहे!.पाणी, शेती आणि शाश्वत विकास” यांचे सुंदर त्रिसूत्री यातून साकार होत आहे.या ऐतिहासिक निर्णयासाठी मनःपूर्वक आभार या प्रकल्पासाठी सातत्याने पुढाकार घेतलेले, सकारात्मक भूमिका बजावलेले आणि निर्णयास पर्यंत पोहोचवणारे खालील सर्व मान्यवर यांचे विशेष आभार व्यक्त करतो .
                 मा. नरेंद्र मोदी साहेब – पंतप्रधान, भारत सरकार,मा.सौ. निर्मला सीतारामन जी – केंद्रीय अर्थमंत्री,मा.नितीनजी गडकरी साहेब – केंद्रीय परिवहन व माजी जलशक्ती मंत्री,मा. सी. आर. पाटील साहेब – केंद्रीय जलशक्ती मंत्री,मा. गजेंद्रसिंह शेकवात साहेब – माजी केंद्रीय जलशक्ती मंत्री,मा. देवेंद्र फडणवीस साहेब – मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. अजितदादा पवार साहेब – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र, मा. एकनाथ शिंदे साहेब – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र, मा. गिरीश महाजन साहेब – जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र, मा. गुलाबराव पाटील साहेब – पालकमंत्री, जळगाव जिल्हा
https://www.facebook.com/share/p/12KuDyVffP5/श्रीमती  स्मिताताई वाघ खासदार जळगाव लोकसभा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 3 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे