राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता पटेकर सह अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश
प्रतिनिधी : जावेद शेख
भाजप मध्ये प्रवेश केला आहे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या राहुरी तालुक्यात राजकीय वातावरणात बदल होताना दिसून येत आहे . लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांचा कल आ.कर्डिलेंकडे येतांना दिसत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे .
आ .कर्डिले म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल करणारा माणूस आहे .सर्वसामान्यांच्या कामी येवून कोणत्याही प्रसंगी पाठिशी ठामपणे उभे राहतात म्हणून आमचा भाजप प्रवेश आहे असे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता पटेकर यांनी सांगितले आहे . तसेच लाडक्या बहिण योजनेमुळे व शासनाच्या असंख्य योजनांमूळे गोरगरिब जनतेला मोठा फायदा झाला असून त्यांची दिवाळी सुखकर झाल्याचे आम्ही पाहिले आहे . यामूळेच जनतेच्या सेवेसाठी सतत प्रयतनशील असणाऱ्या आ . कर्डिलेंना आम्ही पाठिंबा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे मत सिमाताई बोरूडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे . पक्षप्रवेश करतेवेळी दत्ता पटेकर , सिमाताई बोरुडे , हेमंत मकासरे , कुंडलिक गावडे , रवी भालेराव , नरेंद्र दादा शेटे , ज्ञानेश्वर घुले , संदीप ओहोळ , रवी पटेकर , सतीश बोरूडे , राहुल कदम , महेश सोनवणे , अनिकेत गायकवाड , शुभम भालेराव , किरण दगडे , संतोष भगत , अभिषेक आरणे , उमेश सोनवणे , विशाल यादव , अमोल भालेराव , महादेव वाघमारे , अविनाश वैरागर , समीर आडागळे , विपूल भोसलेसह सुरज पारडे उपस्थित होते .
गेल्या तीन दिवसांपूर्वीही तालुक्यातील सडे गावातील अनेक तरूणांनी स्वःता हुन पुढाकार घेत कर्डीले साहेबाना जाहीर पाठींबा देत भाजपा मध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी सडे गावातील तरुणांनी इकडून तिकडे पक्षप्रवेश करून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या सडे गावातील पुढाऱ्याच्या व्यथा मांडून नाराजी व्यक्त केली .या प्रवेशा दरम्यान या तरूणांवर कर्डीलेंना पाठींबा देऊ नये या साठी दबाव टाकण्यात आला असल्याचे कर्डीले यांना समजताच कोणाच्याही धमकीला बळी पडू नये . मि सदैव तुमच्या पाठीशी राहील तुम्ही त्याची काळजी करू नये .निर्भय पणे काम करा तुम्हाला कसलीही अडचण येऊ देणार नाही असे ठोस अश्वासन कर्डीले साहेबांनी या वेळी दिले . आ. कर्डिले म्हणाले की ही लोकशाही आहे त्यामुळे कोणीही हुकुमशाहीचा वापर करू नये व मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये . सद्ध्या सोशल मिडियावर फेक नेरेटिव्ह पसरवण्याचे काम जोरात सुरू आहे परंतू जनता आता याला भुलणार नसल्याचेही यावेळी आ. कर्डिले यांनी बोलतांना सांगितले . सडे गावातील तरुणांनी आ . कर्डिले यांना सडे गावातून लिड तर देऊच पण तालुक्यातील सर्व जनतेने सुद्धा सर्व दृष्टीने विचार करून आ . कर्डिले यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे .