Breaking
ब्रेकिंग

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा १६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न !

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान

0 8 6 7 0 4

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा १६ वा वर्धापन
दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न !

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान

राहुरी तालुका जावेद शेख

सजग पत्रकारितेचा अमीट ठसा उमटवणाऱ्या शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा चा १६ वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ चा भव्य सोहळा अत्यंत प्रेरणादायी व ऐतिहासिक स्वरूपात अहिल्यानगर येथील हॉटेल संजोग च्या प्रशस्त ए.सी. हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे नेतृत्व संपादक मा.रमेश जेठे (सर) यांनी कुशलतेने केले. सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मान्यवर, साहित्यिक, समाजसेवक, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

मुख्य आकर्षण होते आदर्श गांव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रेरणादायी उपस्थिती. त्यांच्यासह मान्यवरांमध्ये दैनिक जयबाबा चे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे, डॉ. बबन जोगदंड, टी.एस. चव्हाण, नगरसेवक नितीन वाघमारे, रवि शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात २९ समाजहितैषी मान्यवरांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” ने गौरवण्यात आले. या मान्यवरांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून ते समाजासाठी दीपस्तंभ ठरले आहेत त्यात सर्वश्री भरत विटकर, सदाशिव जाधव, कर्नल ऋषिकेश धोत्रे, राजेश ननवरे, कीर्ती पवार, संदीप कुसळकर, भोरू मस्के, शाम विटकरी, सुरेश विटकर, चंद्रकांत शहासने, ललित गुंदेचा, धर्मात्मा मिश्रीमल मुथ्था, रवि शिंदे,अप्पासाहेब ढूस, राजकुमार आघाव, रामचंद्र मंजुळे, विष्णू पवार, कृष्णा पवार, सचिन शिंदे, राजू ननवरे, दीपक मेढे, किरण तागडकर, सागर धनवटे, मोहन गायकवाड, नितीन शेलार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीवेतेसाठी समता फाऊंडेशन चे संस्थापक / अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, शिवाजी ननवरे, विशाल जेठे, हरिष बंडीवडार, मयूर मिरे, बबलू विटेकर,डॉ. सुहास पाखरे, निरज जेठे व शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सोहळ्याचे आयोजन हुबेहूब सिनेमासोहळ्याच्या तोडीचे ठरले. अहिल्यानगरच्या धर्तीवर असा भव्य सोहळा प्रथमच पार पडला.
सामाजिक एकतेचा, प्रेरणेचा आणि योगदानाचा उज्ज्वल दीप म्हणून शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा ही जनतेच्या मनात अधिक खोलवर अधोरेखित झाली.अलंकार हा वृत्तपत्राला असतो त्याच्या सत्यवचन, निर्भीडतेच्या तेजात…” याची प्रचिती या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात बघावयास मिळाली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणी सिने क्षेत्रास लाजवेल असे सुयोग्य सुत्र संचालन सुप्रसिद्ध निवेदक उध्दव काळापहाड व प्रियांका मॅडम यांनी केले.शेवटी संपादक रमेश जेठे (सर) यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे