Breaking
ब्रेकिंग

हिंदी सुलेखन परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाचे घवघवीत यश

0 8 6 5 2 1

हिंदी सुलेखन परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाचे घवघवीत यश

प्रतिनिधी: स्नेहल कटारिया

करमाळा: दि. १३/ हिंदी अध्यापक मंडळ, सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदी सुलेखन परीक्षेत महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.

इयत्ता आठवीमध्ये कृष्णा जाधव याने प्रथम, तर शंभू तरकसे याने द्वितीय क्रमांक मिळविला. इयत्ता नववीमध्ये प्रतीक वाळुंजकर याने विद्यालयात प्रथम तसेच सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात तृतीय क्रमांक मिळविला. यश बाबर व ऋतु फंड यांनी द्वितीय क्रमांक, तर सर्वेश्वर गलांडे व शुभांगी गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला. इयत्ता दहावीमध्ये प्रणवी मासाळ हिने प्रथम, तर साक्षी कांबळे हिने द्वितीय क्रमांक मिळविला.

या यशस्वी विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. जयवंतराव जगताप साहेब, विश्वस्त मा. वैभवराजे जगताप साहेब, विश्वस्त मा. शंभूराजे जगताप साहेब, प्राचार्य मा. श्री. बागवान सर, पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे