Breaking
ब्रेकिंग

महावीर जयंती : ‘स्नेहबंध’कडून समाजात बंधुभावाचा संदेश

0 7 6 9 3 2

महावीर जयंती : ‘स्नेहबंध’कडून समाजात बंधुभावाचा संदेश

अहिल्यानगर : जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त स्नेहबंध चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजीमहाराज चौक, भिंगार, अहिल्यानगर येथे (श्री.गुरु वर्धमान भवन जैन स्थानक, भिंगार) भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी चंदनाचा हार अर्पण करून उपस्थितांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. शिंदे म्हणाले, भगवान महावीरांनी दिलेला सत्य, अहिंसा, करुणा आणि संयमाचा संदेश आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजाने आत्मकल्याणासाठी अहंकार, हिंसा आणि अन्यायाचा त्याग करून सदाचाराचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थितांनी महावीरांच्या विचारांचे स्मरण करून समाजात शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश रुजवण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमास महेश नागरी पतसंस्थतेचे चेअरमन डॉ.अशोक चंगेडे, छावणी परिषद नामनिर्देशित सदस्य वसंत राठोड, भंडारी ट्रेडर्सचे संचालक सचिन भंडारी, भिंगार अर्बन बँक चे संचालक रुपेश भंडारी, संचालक विनोद भंडारी, श्रीराम मेडिकलचे संचालक निशांत पानसरे, योग प्रशिक्षक रामचंद्र लोखंडे, प्रथमेश राठोड व जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : भिंगार, अहिल्यानगर येथे स्नेहबंध च्या वतीने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करताना डॉ. उद्धव शिंदे व उपस्थित मान्यवर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे