*को.ऑप.अर्बन बँकेचा भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार*

*को.ऑप.अर्बन बँकेचा भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर को.ऑप.अर्बन बँकेचा शतकमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सभासद ग्राहक मेळावा छ.शिवाजी महाराज नाट्यगृह येथे २९ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून याप्रसंगी बँकेच्या अद्ययावत सोयींनी युक्त नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव रघुनाथ पाटील हे असतील. प्रति पंढरपूर वाडी संस्थानचे गादीपती प.पू.ह.भ.प.संत प्रसाद महाराज यांची यावेळी आशिर्वादपर उपस्थिती राहणार आहे.
जलसंपदा मंत्री ना.गिरीश दत्तात्रय महाजन यांचेसह खा.स्मिता उदय वाघ,माजी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आ. अनिल भाईदास पाटील यांचे हस्ते बँकेच्या विविध दालनांचे उद्घाटन होणार आहे.यावेळी आमदार श्री.अमोल चिमणराव पाटील, आ.श्री. सत्यजित सुधिर तांबे यांच्या हस्ते विविध सभासद ग्राहक ठेवीदारांचा सन्मान होणार आहे.
कार्यक्रमास माजी आ.डॉ.बी एस पाटील,माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील,माजी आ.शिरीष हिरालाल चौधरी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वासराव जयदेव ठाकूर, महाराष्ट्र अर्बन को.ऑप.बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय जव्हेरीलाल ब्रम्हेचा, जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, सहकार भारतीचे संघटन मंत्री दिलीप रामू पाटील, सहकार आयुक्त दिपक तावरे ,विभागीय सहनिबंधक संभाजी निकम सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय बिर्ला,जिल्हा निबंधक गौतम बालसाने, अमळनेर सहाय्यक निबंधक कुणाल सोनार, व्ही.एम.जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर समारंभास अमळनेर अर्बन बँकेच्या सभासदांनी, ग्राहक ठेवीदार व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांचेसह संचालक प्रविण जैन ,लक्ष्मण महाजन भरतकुमार ललवाणी, प्रदिप अग्रवाल, दिपक साळी,अभिषेक पाटील, प्रविण पाटील ,पंडित चौधरी ,मोहन सातपुते,सौ. वसुंधरा लांडगे, डॉ.मनीषा लाठी,अँड.व्ही आर पाटील ,अँड.विजय बोरसे बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले आहे.