Breaking
ब्रेकिंग

योगेश्वर माध्यमिक विद्यालय डांगर बुद्रुक येथे  दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

२५ वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

0 3 9 0 4 8

योगेश्वर माध्यमिक विद्यालय डांगर बुद्रुक येथे  दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

२५ वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :   दिनांक 23/3/ 2025 वार रविवार रोजी योगेश्वर माध्यमिक विद्यालय डांगर बुद्रुक येथे सन 1999 व 2000 तसेच 2001 व 2002 या वर्षीच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. हे स्नेहसंमेलन अतिशय खेळीमळीच्या वातावरणात पार पडले .सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे आभार मानले व आपल्या प्रगतीमध्ये गुरुजनांचा कसा सिंहाचा वाटा आहे हे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला काहींना तर गहिवरून सुद्धा आले. यात सहभागासाठी नासिक, मुंबई, पनवेल, सुरत संभाजीनगर येथून अतिशय आनंदाने माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी देखील सहभाग घेतला. तसेच त्यावेळी* लोंढवे* येथून डांगर येथे शिकण्यासाठी येणारे विद्यार्थ्यांनी देखील यात अतिशय उत्साहात सहभागी झाले.

काही विद्यार्थ्यांची या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने 25 वर्षानंतर एकमेकांशी भेट झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सेवानिवृत्त शिक्षक आर. जी. भामरे सर यांनी भूषविले तसेच या कार्यक्रमास श्री.जे एस पाटील, श्री.डी के खैरनारसर ,श्री.एस एच भोसले सर श्री. डी बी पाटील सर, श्री डी जी वाणखेडकर सर, योगेश्वर माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक श्री. एस व्ही पाटील सर. श्री देसले सर श्रीमती. वैशाली पाटील मॅडम श्री विजय पाटील सर. श्री हर्षल पवार सर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही ए पाटील सर यांनी केले . याप्रसंगी सुरुची भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन व उत्कृष्ट नियोजन डांगर येथील श्री सतीश पाटील श्री जितेंद्र पाटील श्री राहुल पाटील व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे