Breaking
ब्रेकिंग

लोहार समाजातील गुणवंतांचा रविवारी सत्कार सोहळा..

निबंध स्पर्धेचेही पारितोषिक वितरण

0 3 9 0 7 0

 

लोहार समाजातील गुणवंतांचा रविवारी सत्कार सोहळा..

निबंध स्पर्धेचेही पारितोषिक वितरण

वाळकी प्रतिनिधी :- अखिल महाराष्ट्र गाडीलोहार समाज विकास महासंघ, प्रणित लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्यतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व पदोन्नती मिळालेले समाजाचे अधिकारी तसेच पुरस्कार प्राप्त उद्योजक यांचा सत्कार व लोहार शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या निबंधलेखन स्पर्धेत पारितोषिक वितरण समारंभ रविवारी, २५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल द व्हाईटहाऊस कोहिनूर मॉल शेजारी येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती कावरे, महासंघाचे अध्यक्ष सदाशिवराव हिवलेकर , महासंघाचे सचिव प्रा. डॉ.एस . के.पोपळघट, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील १०वी १२वी बोर्ड परीक्षेतील, स्कॉलरशिप व इतर परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी लोहार शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष प्राचार्य सुभाष कौसे, सामाजिक कार्यकर्ते व लोहार शिक्षण परिषदेचे उपसचिव प्रा.हर्षल आगळे मो.9822335592 यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे