Breaking
ब्रेकिंग

भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या वर्धापन दिनी डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

0 7 6 9 4 9

भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या वर्धापन दिनी डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

प्रतिनिधी :   आसावरी वायकर

अहिल्यानगर – भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना ‘अहिल्यानगर आयकॉन अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
समाजसेवा, क्रीडा, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ज़िल्हा परिषद सदस्य तथा महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन शरदभाऊ झोडगे, तसेच छावणी परिषदेचे मनोमीत सदस्य वसंत राठोड, माजी रयत बँकेचे चेअरमन कैलास मोहिते, प्रशिक्षक विठ्ठल काळे, प्रशिक्षक शंकर औरंगे उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. शिंदे यांच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे