Breaking
ब्रेकिंग

पुणे येथील WIE स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आठ देशांच्या आंतरराष्ट्रीय युवा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये नशा मुक्त भारत व फिट इंडिया अभियानाचा जागर

0 8 6 5 0 9

पुणे येथील WIE स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आठ देशांच्या आंतरराष्ट्रीय युवा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये नशा मुक्त भारत व फिट इंडिया अभियानाचा जागर

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

पुणे: दि. २७/ पुणे येथील WIE स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेस आज विशेष उपस्थिती लाभली. या प्रतिष्ठित स्पर्धेत नशा मुक्त भारत अभियानाचे सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसिडर श्री. महेश बबनराव वैद्य आणि त्यांना सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर देशपांडे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरील असून यामध्ये भारत, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, नेपाळ, दुबई, जपान अशा आठ देशांतील युवा खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश निरोगी जीवन आणि व्यसनमुक्त युवा असा आहे. श्री. महेश वैद्य जे गेल्या 28 वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात आणि गेल्या 5 वर्षांपासून स्वतःच्या खर्चाने नशा मुक्त भारत अभियान राबवत आहेत, त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “आजचा युवा हा उद्याचा भारत आहे. जर युवा व्यसनाच्या आहारी गेला तर विकसित भारताचे स्वप्न अपूर्ण राहील. क्रीडा हेच व्यसनमुक्तीचे सर्वात मोठे माध्यम आहे.” यावेळी श्री. किशोर देशपांडे यांनी देखील युवकांना शिस्त, मेहनत आणि फिटनेसचे महत्त्व पटवून दिले.

तेलंगणा संघाला विशेष मार्गदर्शन करताना यावेळी दोन्ही मान्यवरांनी तेलंगणा राज्यातून आलेल्या प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या संघाशी विशेष संवाद साधला. त्यांना आहार, फिटनेस आणि मानसिक तयारी बद्दल मोलाचे मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

श्री वैद्य व श्री देशपांडे यांनी सर्व उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, भारतात गुणवत्ता आणि प्रतिभावान खेळाडूंची अजिबात कमतरता नाही. जगात भारताची ताकद दाखवायची असेल तर आपल्याला तळागाळातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि व्यसनमुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे लागेल. असे झाल्यास ऑलिंपिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारत नक्कीच सुवर्णपदकांची लयलूट करेल”असे मत त्यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे