Breaking
ब्रेकिंग

खेळाडूंनी परिश्रमाच्या बळावर मिळवलेले यश प्रेरणादायी : डॉ. उद्धव शिंदे

0 7 6 9 4 3

खेळाडूंनी परिश्रमाच्या बळावर मिळवलेले यश प्रेरणादायी : डॉ. उद्धव शिंदे

प्रतिनिधी : संवेद वायकर

अहिल्यानगर – भिंगारसारख्या स्थानिक पातळीवरून एवढ्या गुणवत्ता असलेले खेळाडू पुढे येत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. या सर्व युवकांनी चिकाटी, शिस्त आणि परिश्रमाच्या बळावर मिळवलेले यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
भिंगार क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
ते म्हणाले, स्नेहबंध नेहमीच अशा प्रतिभावान खेळाडूंच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन देत राहील. भविष्यात हेच खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अहिल्यानगरचा झेंडा उंचावतील, असा मला विश्वास आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये अर्पिता भंडारी (२०० मि.प्रथम), श्रावणी बेरड (१००/२०० मि.प्रथम), नवनाथ बेद्रे (६०० मि./लॉंग जम्प प्रथम), माही परदेशी (नमो मॅरेथॉन विजेता), महेश वायकर (पुणे मॅरेथॉन द्वितीय), कबीर बेरड (अग्निवीर जीडी), आदेश आल्हाट (अग्निवीर जीडी), आकाश बडे (अग्निवीर टेक्निकल) यांचा समावेश आहे.

तसेच, पुणे येथे नुकत्याच झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत महेश वायकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवत भिंगारचा गौरव वाढवला. ते आगामी १२ तास स्टेडियम रन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या सर्व खेळाडूंना मेजर विठ्ठल काळे व राष्ट्रीय खेळाडू शंकर औरंगे यांचे प्रशिक्षण लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे