श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री सुरज बोबे यांचे कडून ५,००१/ ₹. देणगी कमला भवानी चरणी अर्पण

श्री कमला भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री सुरज बोबे यांचे कडून ५,००१/ ₹. देणगी कमला भवानी चरणी अर्पण
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २६/ करमाळा येथील श्री कमला देवी मंदिर जीर्णोद्धारासाठी दि. २५/०८/२०२६ रोजी श्री नारायण गणपत बोबे सर यांचे सुपुत्र श्री सुरज नारायण बोबे रा. करमाळा सध्या कळवा, ठाणे यांचे कडून ५,००१/ ₹. देणगी श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन कामस प्राप्त झाली. यावेळी श्री कमला देवी मंदिर समितीकडून मंदिर पुजारी बाळासाहेब सोरटे, अशोक गाठे व्यवस्थापक यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोबे परिवार, मानकरी, सेवेकरी, भक्तगण इत्यादी उपस्थित होते.
यापूर्वी सुद्धा श्री. नारायण बोबे सर, आणि परिवार यांच्या कडून या अगोदर ही मंदिर जतन संवर्धन कामास अनेक वेळा देणगी प्राप्त झाली आहे.
प्राप्त झालेली देणगी खालील प्रमाणे:-
देणगी प्राप्त झालेली आहे.
१) दिनांक. ०६.११.२०२४. रोजी रु २१,०००/ देणगी
२) दिनांक १२.०४.२०२५.
रू ११,०००/
३) दिनांक२३.१२.२०२५. रू ११,०००/
४) दिनांक १९.०४.२०२६ रोजी रू. ११,०००/
५) दिनांक १९.०४.२०२६ रोजी रू.१,०००/
६) दिनांक २५.०८.२०२६.रोजी रोख देणगी रु. ५,००१/अशी एकूण आज पर्यंत एकूण रु. ६०,००१/ देणगी बोबे परिवार करमाळा यांच्या कडून प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल कमलादेवी मंदिर समितीकडून बोबे सर व त्यांचे परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले.

श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट करमाळा यांचे कडून करण्यात आलेले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध आहे.
देणगीसाठी संपर्क:- अशोक गाठे व्यवस्थापक. मो. नं. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४.


