ब्रेकिंग
द. गो.पाटील यांचे निधन
0
3
9
0
4
0
द. गो.पाटील यांचे निधन
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
वायशेत, ता. अलिबाग येथील ज्येष्ठ ग्रामस्थ दत्ताराम गोपाळ पाटील यांचे बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी वयाच्या 98 व्या वर्षी, वृद्धापकाळाने निधन झाले. वायशेत येथील ग्रामविकास मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. तसेच त्यांनी गावातील संगीत भजनी मंडळीची दीर्घ काळ सेवा केली. गावातील सर्व सार्वजनिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे.
त्यांचे अंत्ययात्रे मध्ये अलिबाग तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
त्यांचे मागे तीन विवाहीत सुपुत्र, कन्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
वायशेत येथील उद्योजक प्रमोदशेट पाटील यांचे ते वडील होत.
0
3
9
0
4
0