ब्रेकिंग
अल्टो कारला आग लागून गाडी जळून खाक ; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तात्काळ दाखल

0
8
6
5
2
1
अल्टो कारला आग लागून गाडी जळून खाक ; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तात्काळ दाखल
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
नगर–सोलापूर रस्त्यावर वाळूज बायपास उड्डाणपुलाजवळ, नालंदा शाळेसमोर रविवारी चारचाकी अल्टो कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
या घटनेमुळे नगर–सोलापूर मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण आणि वाहनाच्या नुकसानीचा तपशील समोर आलेला नाही.
0
8
6
5
2
1


