Breaking
ब्रेकिंग

जनता कला व विज्ञान महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थी विकास मंडळा कडून आयोजन

0 3 9 0 5 1

जनता कला व विज्ञान महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थी विकास मंडळा कडून आयोजन

एस डब्ल्यु न्यूज / वृत्तसेवा

अहिल्यानगर :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे व विद्यार्थी विकास मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या रुईछत्तीसी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . त्यास विद्यार्थिनी चा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . या कार्यशाळेत श्री बाणेश्वर महाविद्यालयाच्या प्रा डॉ एम एन पुंडे ( शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ), वैद्यकिय अधिकारी डॉ डी जी कडुस, जनता कला व विज्ञान महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा डी बी वाळके यांचे व्याख्याने आयोजित करण्यात आले होते . त्याच बरोबर विद्यार्थिनीना स्वसरक्षणाचे प्रात्यक्षिक देऊन स्वसवरक्षणाच्या ट्रीक देण्यात आल्या . कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर करांडे हे होते .

यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ डी एस तळुले , प्रा डॉ एम एन पुंडे , वैद्यकिय अधिकारी डॉ डी जी कडुस, प्रा डी बी वाळके, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा सरला अनिल कोलते उपस्थित होते .

विद्यार्थी विकास अधिकारी प्रा सरला अनिल कोलते यांनी प्रस्ताविकात कार्यशाळा आयोजन करण्याचा उद्देश स्पष्ट केला .प्रा नयना क्षीरसागर यांनी अतिथी परिचय करून दिला .प्रा डॉ एम एन पुंडे यांनी विद्यार्थीना कठिन प्रसंगी न घाबरता स्वसरक्षण कश्या प्रकारे करावे या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले . त्याच बरोबर स्वस्वरंक्षणाचे प्रात्यक्षिके करून दाखविले .

वैद्यकिय अधिकारी डॉ डी जी कडुस यांनी विद्यार्थिनीना आरोग्य विषयक मार्गदर्शन करत आहार बाबत माहिती दिली . तसेच आपले आरोग्यप्रा डी बी वाळके यांनी योगाभ्यासाचे महत्व स्पष्ट करून नियमित योग आभ्यासाने शरीर स्वास्थ्य बरोबरच मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त राहतेमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर करांडे यांनी  अध्यक्षीय  भाषण केले .

यावेळी प्रा.आर. बी सुपेकर , ग्रंथपाल ए.एस .धनवट , प्रा आर. एल गोरे, प्रा. एस.एस भणगे, डॉ.ए. आर. कोलते, प्रा. डी. बी, वाळके, प्रा. के. एन. पाटोळे ,प्रा. एम.डी . पोटरे, प्रा. एस .आर. बोरुडे प्रा. एस. एस नवले, प्रा. एन. एस सय्यद, प्रा. एन. बी क्षीरसागर, प्रा. एम. व्ही रणसिंग, प्रा. एस. ए कोलते, प्रा. के. टी निक्रड, प्रा. एस. आर टकले, डॉ. आर. आर. साळवे, प्रा. व्ही. बी खामकर, प्रा. एस. जी दगाबाज, प्रा. एस. पी गायकवाड, प्रा. एस. ए जोशी, प्रा. जी. व्ही गायकवाड, प्रा. टी. एम गोरे, एन. एम खैरे, एन. व्ही म्हस्के, एम. ए हराळ, पी. के गोरे, एम.पी. ठोंबरे आदी सह विद्यार्थिनी तसेच ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रा एम. व्ही रणसिंग यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . प्रा. नदीम सय्यद यांनी आभार मानले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे