शिवसेना जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्यांचे न्यायालय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिवसेना जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्यांचे न्यायालय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
नशिराबाद :- दि. ११ एप्रिल -“शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नाही, तर जनतेच्या सुख-दुःखाशी घट्ट नाळ जोडलेली एक जिवंत चळवळ आहे. सर्वसामान्य माणसाच्या अडचणी ऐकून त्याला न्याय देणे आणि संकटात खंबीरपणे उभे राहणे हीच शिवसेनेची ओळख आहे. पंकज महाजन यांच्या पुढाकारातून उभे राहिलेले हे जनसंपर्क कार्यालय केवळ कार्यालय न राहता सर्वसामान्यांचे न्यायालय बनले पाहिजे. इथून जाणारा प्रत्येक नागरिक समाधान आणि न्याय मिळाल्याच्या भावनेनेच परतला पाहिजे,” असा दमदार व भावनिक संदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. नशिराबाद येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी, तसेच गुणवंतांचा सत्कार आणि महिला आघाडी स्थापनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पदाधिकारी डीगंबर रोटे हे होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “पदापेक्षा काम मोठं असतं – काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता नेहमी उभी राहते. नशिराबादमधील एकजूट, कार्यकर्त्यांची तळमळ आणि जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते प्रेरणादायी आहे. महिलांना नेतृत्वाच्या संधी देणे ही काळाची गरज असून त्यांच्या सहभागामुळे नशिराबाद विकासाचा आदर्श उभा राहील, याचा मला पूर्ण विश्वास आहे. यावेळी त्यांनी कौटुंबिक भावनेलाही स्पर्श करत सांगितले की, “पत्नीच्या सहकार्याशिवाय कोणतेही यश पूर्ण होत नाही. पत्नीचा वाढदिवस साजरा करत जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करणे ही उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांची भावना खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
नशिराबाद शहरातील विठ्ठल मंदिरासमोरील खालची आणि होळी मैदान परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्या पत्नी नगरसेविका व माजी जिल्हा परिषद सदस्या लीना महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
• शिवसेना महिला आघाडीची झाली स्थापना*
कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडीच्या नशिराबाद शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये शहरप्रमुख म्हणून हेमाली पाटील, शाखाप्रमुख चारुताई पाटील, उपशाखाप्रमुख आशाताई पाटील, समन्वयक जागृती रोटे यांची निवड करण्यात आली. महिला आघाडीच्या फलकाचे अनावरणही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
• पालकमंत्र्यांचा सन्मान पत्र देवून भव्य सत्कार*
या प्रसंगी फटाक्यांच्या आतषबाजीत व मोठ्या जल्लोषात नशिराबाद नगरपालिकेच्या वतीने तसेच लेवा समाज व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सामाजिक सभागृहांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पीएचडी प्राप्त करणारे सुभाष तळले, ‘खानदेश रत्न’ पुरस्कार विजेते बांधकाम सभापती विकास पाटील, मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे, ए.पी.आय. योगिता नारखेडे, मनपा स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेले प्रदीप रोटे, तसेच संभाजीनगर येथे बजाज कंपनीत जनरल मॅनेजर पदावर नियुक्त झालेले नितीन पाटील यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन उपशिक्षिका सुचिता पांढरकर यांनी केले. प्रस्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्या व नगरसेविका लीना महाजन यांनी केले तर आभार डी.एस. पाटील सर यांनी मानले.
• यांची होती उपस्थिती*
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ), उपनगराध्यक्ष, कार्यक्रमाचे आयोजक पंकज महाजन, बांधकाम सभापती विकास पाटील, कैलास व्यवहारे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील, नगरसेवक किर्तीकांत चौबे, चेतन बहऱ्हाटे, भारतीबाई धनगर, मन्यार कमरुनिसा सय्यद, बिस्मिल्ला, विकास धनगर, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, रवी कापडणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, राजेंद्र चव्हाण, मार्केटचे माजी सभापती श्याम सोनवणे, गोकुळ चव्हाण, यश सपकाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, हर्शल मावळे, शहर प्रमुख रोटे, यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महिलांचीही लक्षणीय उपस्थिती यावेळी दिसून आली.



