शिरवली नवीन वसाहतीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न

शिरवली नवीन वसाहतीत शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवशाली पराक्रमगाथा नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत सातविरादेवी मित्रमंडळ, नवीन वसाहत शिरवली यांच्यातर्फे दिनांक १७ मार्च २०२५ रोजी शिवजयंती सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या सातविरादेवी मित्रमंडळ शिरवली यांच्यातर्फे साजऱ्या केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे हे आठवे वर्ष होते. यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
शिवज्योत आगमन, मिरवणूक, शिवपूजन, शिववंदन व आरती, हळदीकुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजक खेळ, स्नेहभोजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य यावरील पोवाडा व भाषणे सादर करण्यात आली. मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिरवली ग्रामस्थ, महिला यांनी हा सोहळा यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी परीश्रम केले.