जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटरसायकल, गाड्यांचे टायर व हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिला व मुलांच्या सराईत टोळीला राहुरी पोलिसांनी केली अटक
सदर टोळीची म्होरक्या रेखा पवार हिने अल्पवयीन मुलगा वय 16 याला पळवून नेऊन धमकावून बळजबरीने सदर गुन्ह्यात चोऱ्या करायला भाग पाडले
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटरसायकल, गाड्यांचे टायर व हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिला व मुलांच्या सराईत टोळीला राहुरी पोलिसांनी केली अटक
सदर टोळीची म्होरक्या रेखा पवार हिने अल्पवयीन मुलगा वय 16 याला पळवून नेऊन धमकावून बळजबरीने सदर गुन्ह्यात चोऱ्या करायला भाग पाडले
विशेष वृत्तसेवा / जावेद शेख
अटकेदरम्यान राहुरी पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलिस स्टेशन येथील एकुण 4 गुन्हे उघडकीस*
आरोपींकडून 425400/- रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत, आणखी काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता
दिनांक 25/01/2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे राहुरी शहरातुन मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुरनं 51/2025 बी एन एस 305(ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातीलसंशयीत आरोपींची गोपनीय माहिती मा.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली की राहुरी फॅक्टरी येथील महिलाही तिच्या साथीदारांसह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करते. तसेच तिने सदर चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलास पळून आणलेले आहे व त्याच्याकडूनही ती बळजबरीने चोऱ्या करून सदर माहितीच्या अनुषंगाने संशयित *आरोपी 1)रेखा शरद पवार वय- 29, 2) विक्रांत संजय ससाने वय 21,3) अमिषा सिलीमान सय्यद वय-21, सर्व रा. प्रसाद नगर, राहुरी फॅक्टरी,ता-राहुरी* यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने व त्यांनी अल्पवयीन सोळा वर्षे मुलास पळून आणल्याचेही निष्पन्न झाल्याने सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याचे आईचे ताब्यात देण्यात आले. आणि संशयित आरोपी 1)विक्रांत संजय ससाने याला दिनांक 02/02/25 रोजी व 2)रेखा शरद पवार 3)अमिषा सिलेमान सय्यद यांना दि .03/02/25 रोजी अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता, सदर आरोपींना चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. रिमांड कालावधीमध्ये तपासात आरोपींकडून *जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या 5 मोटरसायकल, गाड्यांचे टायर, हॉटेलमधील साहित्य व गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असे एकूण 425400/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.*
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल- संदिप ठाणगे,विजय नवले, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख,जयदीप बडे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप ठाणगे करीत आहे.