Breaking
ब्रेकिंग

नागपुर येथे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या अधिवेशनाला उत्तम प्रतिसाद. .

0 3 9 0 2 2

नागपुर येथे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या अधिवेशनाला उत्तम प्रतिसाद. .

अलिबाग /  प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन ज्ञानविकास विदयालय नंदनवन नागपुर येथे संघाचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली 2फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाले.
या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे आ. कृष्णाजी खोपडे आमदार पूर्व नागपूर आ .राजूभाऊ पारवे ,
माजी आमदार भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र मा.संदीप जोशी, माजी महापौर नागपूर,सुरेश लेंडे उपसभापती उमरेड, हरीश दिकोंडवार माजी नगरसेवक नागपूर,तसेच संघटनेचे राज्य सल्लागार परसराम हेंबाडे ,सुरेश लांजेवार , राज्य प्रवक्ता सुनील गुरव, राज्य संपर्कप्रमुख गजानन देशमुख , महिला प्रतिनिधी चंद्रराणी कुसेकर, प्राजक्ता रणदिवे, विभागीय अध्यक्ष संदिप वारगे कोकण, सतिष चिपरीकर पुणे, जगन्नाथ पोटे नागपुर, भास्कर भेलकर माजी सेवानिवृत्त शिक्षक कळमेश्वर, सुरेश लांजेवार, सुरेश भोसकर संचालक उत्कर्ष पद संस्था नागपूर आदि उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदीप बिबटे विभागीय उपाध्यक्ष नागपूर विभाग यांनी केले , सुत्रसंचलन विजया कोकमवार यांनी केले तर आभार प्रदर्शंन विभागीय सरचिटणीस बळीराम चापले यांनी मानले.
अधिवेशनात राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे निवेदन आमदार यांना संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर व राज्य पदाधिकारी यांनी दिले यावेळी आमदार कृष्णाजी खोपडे यांनी प्रश्नाविषयी संघटनेचे पदाधिकारी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या सोबत आयोजित करुन सोडविण्यात येतील असे आश्वासन संघटना पदाधिकारी व उपस्थित राज्यातुन आलेल्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिले .

संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी शेवटच्या श्वासापर्यंत पर्यंत प्रयत्न करणार असे अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले, जिल्हाध्यक्ष सुनिल नायक यांनी राज्यातुन आलेल्या सर्व पदाधिकारी व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा परिचय दॆऊन सन्मानप्रमाणपत्राचे वितरण केले, यावेळी जैतादेही पॅटर्न, पिंक रूम आणि 365दिवस शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी झपाटून काम करणारे राज्य अध्यक्ष मा.सुभाष जिरवणकर यांचे कौतुक कोकण विभागीय अध्यक्ष श्री संदीप वारगे यांनी मनोगतातून व्यक्त केले. या अधिवेशनयशस्वी झाल्याबद्दल रायगडचे जिल्हाध्यक्ष संतोष दातिर, डॉ.अनिल पाटील, मनोज पाटील, शरद नागटिळक, सुनिल पाटील, राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे सिंधुदूर्ग आदींनी राज्य कार्यकारिणीचे कौतुक केले.

राज्य अधिवेशन यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण डांबलकर अकोला, सुरेंन्द्र अर्डक अमरावती रमेश गंगावणे हिंगोली, घनश्याम पटले गोंदिया, सुधाकर चरडुके चंद्रपुर, बळीराम चव्हाण वर्धा, आसाराम चव्हाण अमरावती, स्पृहा इंदू मुंबई, प्रेरणा शेलवणे ठाणे, शारदा रोशनखेडे, दीप्ती बिष्ट नागपुर यासह नागपूर जिल्हा संघटना, यांनी अधिवेशन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे