Breaking
ब्रेकिंग

करमाळा शहरासह तालुक्याच्या विकासासाठी आपण कटीबद्ध – मा . नगराध्यक्ष वैभवराजे जगताप

शहरासह तालुक्यात एकनाथ शिंदे यांचे विचार पोहचवणार....

0 7 6 9 4 3

करमाळा शहरासह तालुक्याच्या विकासासाठी आपण कटीबद्ध – मा . नगराध्यक्ष वैभवराजे जगताप

शहरासह तालुक्यात एकनाथ शिंदे यांचे विचार पोहचवणार….

करमाळा (विशेष प्रतिनिधी :  सचिन जव्हेरी)

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आपणास जनतेच्या सेवेसाठी शिलेदार म्हणून नेमले आहे . मा . आ . जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख महेशदादा चिवटे व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरासह तालुक्यामध्ये स्व . बाळासाहेब ठाकरे , स्व . आनंद दिघे व उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार पोहचवून, संपूर्ण तालुका भगवामय करू असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट ) यूवा नेते वैभवराजे जगताप यांनी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्कारास उत्तर देताना केले . ना . एखनाथराव शिंदे हे खऱ्या अर्थाने जनतेचे मुख्यमंत्री असून राज्यातील सर्वसामान्यांसह सर्वांच्या अडीअडचणी सोडवणारं एक स्वयंभू नेतृत्व आहे असे ते म्हणाले . नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना शहराचा विकास करण्याचे ध्येय समोर ठेवले . कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून मिळवला . स्वच्छतेच्या बाबत ५ कोटी रुपयांचे बक्षिस मिळवले . शहरात अनेक कामे केलेली आहेत . अजून बरीच कामे करण्यासारखी असून आपण ती पूर्णत्वास नेऊ असे ते बोलले . शहरवासियांनी कोणतेही काम असो तुमच्या अडचणी आपण सोडवू अशी ग्वाही दिली . यावेळी ॲड .नवनाथ राखूंडे यांनी प्रास्ताविक केले . तर शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे , गटसचिव नेते बबन मेहेर , शिवसेना तालुका प्रमुख अनिल पाटील ,सचिव दत्ता शिर्के भाऊसाहेब , प्राचार्य बाळकृष्ण पाटील ,मुख्याध्यापक दयानंद चौधरी , सचिन अब्दुले सर आदींनी मनोगतं व्यक्त केले . या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी , नगरसेवक प्रशांत ढाळे , माजी नगरसेवक अजित परदेशी , झनकशेठ परदेशी , नजीर अहमद कुरेशी , गुलाम कुरेशी , अस्लम वस्ताद कुरेशी , बाजार समिती माजी संचालक दादासाहेब लबडे , संचालक मनोज पितळे , परेश दोशी , हनुमंत ढेरे , माजी नगरसेवक सुरेश इंदूरे , हनुमंत फंड , दादाराम लोंढे , डॉ . रोहन कुंभार, शिवसेना शहर प्रमूख संजय शिलवंत , युवासेना प्रमूख चंद्रकांत राखूंडे , बाजार समिती सचिव विठ्ठल क्षिरसागर , संचालक जनार्दन नलवडे , शहाजी शिंगटे , ॲड . एम .डी .कांबळे, रामदास गुंडगिरे , बाळासाहेब बलदोटा ,अमोल जाधव , जोतीराम ढाणे , अमोल परदेशी , गणेश कुकडे , सुधा गवळी , विकास आमृळे , मनोहर गुंडगिरे , शंकर नलवडे ,बाळासो कांबळे ,दादा धाकतोडे , तानाजी कुकडे ,लाला घोडके , रोहीदास आल्हाट , संतोष कारंडे , संजय ढाणे , बळीराम दुधाट ,अन्वर बागवान ,आदीसह व्यापारी असोशियशन चे सर्व व्यापारी , सर्व कॉन्ट्रॅक्टर्स ,महात्मा गांधी विद्यालय , भैरवनाथ विद्यालय चा स्टाफ , नगरपालिका शिक्षण मंडळाचे कर्मचारी ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी, बाजार समितीचे आजी -माजी संचालक , सह खरेदी विक्रीसंघाचे पदाधिकारी , विवीध गावचे कार्यकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी व सचिव ,ग्रामपंचायत , पंचायत समिती व जि प चे आजी माजी पदाधिकारी , पत्रकार बंधू इ . सह राजकीय , सामाजिक व वैदयकीय , उदयोग , व्यापार व शैक्षणिक क्षेत्रातील मित्रपरिवार व जगताप प्रेमी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सकाळ पासूनच मित्रपरिवार व कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ होती . सायंकाळी शिवसेनेच्या शहरामध्ये गणेशनगर व सुतार गल्ली येथे शिवसेने च्या शाखा स्थापन करण्यात आल्या .

आपला वाढदिवस हा सोहळा नसून नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याचा प्रसंग आहे.जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनखाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आपल्यावर शिलेदाराची जबाबदारी त्यांचे विचार घराघरात पोहचवून पार पाडणार..
…वैभवराजे जगताप

शिवसेनेच्या शाखा स्थापनेचा धुमधडका सुरू करण्यात आला..शहरात दोन शाखा स्थापन.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे