Breaking
ब्रेकिंग

शालेय विभागीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय 19 वर्षे वयोगट मुले विजयी. राज्य शालेय स्पर्धेसाठी शाळेच्या संघाची निवड.

0 7 6 9 4 3

शालेय विभागीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय 19 वर्षे वयोगट मुले विजयी.
राज्य शालेय स्पर्धेसाठी शाळेच्या संघाची निवड.

राहुरी तालुका जावेद शेख

16 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठ येथे 14 ,17, 19 वयोगट मुले यांच्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरुणजी तूपविहिरे सर व उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब डोंगरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग नोंदविला होता.
यामध्ये 14 वर्षे वयोगट सोमय्या विद्यालय लक्ष्मीवाडी शिर्डी. यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
सतरा वर्ष वयोगटांमध्ये रामदास पाटील धुमाळ राहुल कॉलेज यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
तर 19 वर्षे वयोगटामध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठाच्या खेळाडूनी प्रथम क्रमांक मिळविला.
या तीन ही संघांची आपापल्या गटामधून नाशिक येथे होणाऱ्या शालेय राज्य टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन.
यावेळी प्रशिक्षक व क्रीडा मार्गदर्शक घनश्याम सानप सर, प्राध्यापक संतोष बर्डे सर, श्री अमोलिक सर, श्री प्रसाद सामलेटी सर, न्यू आर्ट्स चे आकाश नढे सर,सोलापूरचे नौशाद सर आदि उपस्थित होते.
विजयी संघांचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडाधिकारी भाऊराव वीर. विशाल गर्जे आदींनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे