Breaking
ब्रेकिंग

गणेशोत्सवा निमित्त कर्मवीर अण्णासाहेब जगताप कला व क्रीडा मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व औषध वाटप कार्यक्रम संपन्न

0 8 9 6 7 3

गणेशोत्सवा निमित्त कर्मवीर अण्णासाहेब जगताप कला व क्रीडा मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व औषध वाटप कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/ गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या सौजन्याने व कर्मवीर अण्णासाहेब जगताप कला व क्रीडा मंडळाच्या वतीने जन आरोग्य शिबीर राबविण्यात आले. या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये ११२ जणांची तपासणी करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, स्थानिक रहिवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला यामध्ये. उत्सवाच्या काळात केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम न घेता, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याच्या भावनेतून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरासाठी डॉ. शरदकुमार पवार यांनी तपासणी केली. त्यामध्ये विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), आणि ईसीजी (ECG) यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले. 

यावेळी आरोग्य जनजागृतीवर माहिती देताना पावसाळी आजार, डेंग्यू, मलेरिया यांपासून बचाव करण्यासाठी आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत डॉक्टर पवार यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी मंडळाचे संस्थापक अॕड. शिवराज जगताप म्हणाले की, मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम गणेशउत्सव काळात घेतले जातात परंतु, वर्षभर विविध सामाजिक उपक्रम, वृक्षरोपण तसेच वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून मंडळ कार्यरत असते. मंडळाच्या वतीने सामाजिक सलोखा राखला जातो. गणेश उत्सव काळामध्ये सर्व बहुजन बांधवांना एकत्रित करून सामाजिक समतेचा संदेश दिला जातो. या मंडळामध्ये हिंदू, दलित मुस्लिम एकत्रित येऊन यामधून सर्व धर्म समभावाचा संदेश यातून दिसून येतो.

यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “उत्सवाचा आनंद घेत असताना समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश होता.” या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मंडळाचे विशेष आभार मानले. शिबिराच्या उद्घाटनानंतर श्री गणेशाची आरती केली.

यावेळी आझाद शेख, नगरसेवक युवराज चिवटे, समीर शेख , नागेश राखूडे, इंगोले राजू, दुधाळ महाराज, राखूडे, नरेंद्रसिंह ठाकूर, शिवराज जगताप, अॕड. जांभळे आधी जण उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी आपला दवाखाना करमाळा चे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरदकुमार पवार , आरोग्य सेवक दत्ता राठोड, तरवारे सिस्टर आणि गणेश मंडळ पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे