Breaking
ब्रेकिंग

निधी अभावी आणि तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा योजना रखडल्या

वीज कनेक्शन मिळत नसल्याने योजना पूर्ण होऊनही पाणी सुरु होत नाही

0 7 6 9 4 3

निधी अभावी आणि तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा योजना रखडल्या

वीज कनेक्शन मिळत नसल्याने योजना पूर्ण होऊनही पाणी सुरु होत नाही

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : तालुक्यात १५४ पैकी १३३ गावांना पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून मंजूर होऊन कामेही सुरू झाले. मात्र फक्त १४ ग्रामपंचायतीच्या योजना पूर्णत्वास आल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून निधी नाही आणि अनेक गावांत पाण्याच्या टाक्यांना जागा मिळत नसल्याने योजना रखडल्या आहेत.अमळनेर तालुक्यातील १३३ पैकी तांदळी , खेडी प्र अमळनेर , पळासदळे , अंतुर्ली , बोदरडे , खवशी , गडखाम्ब , वावडे , भरवस , एकतास , पिंपळी प्र जळोद , लोण पंचम , हिंगोणे बुद्रुक, ढेकू चारम या १४ गावांच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत.नांद्री ,बिलखेडा , पिंगळवाडे , निंभोरा या गावांना विहिरीला जागा दिली जात नसल्याने योजना पूर्ण करता येत नाही.तर गलवाडे खुर्द , अंबारे , नंदगाव, लडगाव , शिरूड या गावांना टाकीला जागा दिली जात नाही. तर अमळगाव येथे जागा दिली असून फक्त ठराव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिला जात नाही. एकंदरीत तांत्रिक अडचणी ,गावातील राजकारण हे देखील पाणी पुरवठा योजनांना अडथळा ठरत आहे.त्याचप्रमाणे ४४ योजना पूर्ण झाल्या आहेत मात्र त्या गावांवर लाईटबील थकीत असल्याने वीज वितरण कंपनीतर्फे पाणी पुरवठा योजनांना वीज कनेक्शन दिले जात नाही. त्यामुळे देखील योजना पूर्ण होऊनही ग्रामस्थांना पाणी मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे.
तसेच गेल्या आठ महिन्यांपासून पाणी पुरवठा योजनांचा निधी आला नसल्याने ठेकेदारांची बिले निघाली नाहीत. परिणामी ठेकेदार पुढील काम करण्यास तयार नाहीत. एक वर्षात योजना पूर्ण होणे अपेक्षित असताना दोन अडीच वर्षे होऊनही योजना पूर्ण होत नाही.फेब्रुवारी महिना येऊन ठेपला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक गावांना पाण्याची टंचाई भासू शकते. त्यामुळे वेळेवर योजना सुरू झाल्यास ग्रामस्थांना वणवण भटकावे लागणार नाही.

पालकमंत्र्यांनी झापले !

वीज वितरण कंपनी वीज कनेक्शन देत नसल्याने अनेक गावांच्या तक्रारी होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दक्षता समिती बैठकीत वीज वितरण च्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. गावकऱ्यांना पाण्यासाठी वीज कनेक्शन ला अडवणे चुकीचे आहे असे सांगून तात्काळ वीज कनेक्शन देण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी माजी मंत्री अनिल पाटील , मंगेश चव्हाण ,किशोर पाटील , चंद्रकांत सोनवणे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार हजर होते.

वीज वितरण कंपनीने वेळेवर वीज जोडणी केल्यास ४४ पाणी पुरवठा योजना आजच सुरू होतील. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही. – – – –  –   डी डी पाटील , उपविभागीय अधिकारी ,ग्रामीण पाणीपुरवठा अमळनेर

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे