डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध मध्ये चि .सिद्धेश क्षीरसागर आठवा !
डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध मध्ये चि .सिद्धेश क्षीरसागर आठवा !
एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा
आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित आणि जय बजरंग प्राथमिक विद्यालय पाईपलाईन रोड ,सावेडी , अहिल्यानगर येथील जय बजरंग प्राथमिक विभागाचा चि. सिद्धेश अमोल क्षीरसागर इ.५ वी .याने जिल्हास्तरीय अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये (३०० पैकी २७६ )गुण मिळवून जिल्हा यादीमध्ये आठवा येण्याचा मान पटकावला! त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! त्याला श्री. राहुल मोरे सर, श्री. भागचंद पाखरे सर, श्रीम. अश्विनी बेरड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन !!
आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.नरेंद्रजी फिरोदिया सर सहसचिव उमेशजी गांधी सर, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल क्षीरसागर सर यांच्यातर्फे त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .
सिध्देश क्षीरसागर याचे सामाजिक राजकिय सर्व स्तरातून कौतुक होत आहे . त्याच्या या यशाने सिद्धेश ने अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .