कर्तव्यावर हौतात्म्य पत्करलेल्या जवानांचे स्मरण – डॉ. उद्धव शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली
कर्तव्यावर हौतात्म्य पत्करलेल्या जवानांचे स्मरण – डॉ. उद्धव शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली
प्रतिनिधी : संवेद वायकर

अहिल्यानगर – देशासाठी आपले कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिस हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी ‘पोलीस स्मृतिदिन’ साजरा केला जातो. या निमित्ताने अहिल्यानगर पोलीस मुख्यालय येथे हुतात्मा जवानांना स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी आदरांजली वाहिली.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले की, “पोलिस दल हे राष्ट्राचे खरे रक्षणकर्ते आहेत. त्यांच्या त्याग, शौर्य आणि सेवेमुळेच समाजात सुरक्षितता टिकून आहे.”
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांशी झालेल्या संघर्षात केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी शौर्याने लढत प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून हा दिवस ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात आणि राज्यभरात शहीद झालेल्या सर्व पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक (गृह) जगदीश भांबळ, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, राखीव दलाचे पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, सहा.पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.



