Breaking
ब्रेकिंग

कमलादेवी मंदिरातील 24000 रूपयांच्या दागिन्याची चोरी उघडकीस

करमाळा पोलिसांचे भक्तांकडुन अभिनंदन

0 8 6 5 1 7

कमलादेवी मंदिरातील 24000 रूपयांच्या दागिन्याची चोरी उघडकीस

करमाळा पोलिसांचे भक्तांकडुन अभिनंदन

करमाळा /  विशेष प्रतिनिधी :  सचिन जव्हेरी

कमला देवी मंदिरातील उत्सव मुर्तीच्या दागिन्याची चोरी उघडकीस- २४,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र केले जप्त आहे.यात हकिकत अशी कि, दि २२/०८/२०२५ रोजी सायंकाळी ०५/०० वा ते दि. २३/०८/२०२५ रोजी पहाटे ०५/३० वा चे दरम्यान फिर्यादी रोहीत महादेव पुजारी, वय २२ वर्षे व्यवसाय पुजारी, रा. देवीचा माळ, करमाळा ता करमाळा जि सोलापूर यांनी मौजे देवीचा माळ येथील कमला भवानीच्या मंदिरातून कमलाभवानी उत्सव मुर्तीचे गळयातील २४,०००/-रु किंमतीचे दोन वाटया असलेले व त्याला चार मणी असलेले सोन्याचे अंदाजे २.४ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसुत्र हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुददाम लबाडीने चोरुन नेले बाबत करमाळा पोलीस ठाणेस गुरनं. ६९५/२०२५ बी एन एस कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
करमाळा पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण मागील काही महिन्यापासून चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. (भा.पो.से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक, श्री रणजीत माने यांनी अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गर्शनाने पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरनण शाखेच्या अंमलदारांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकामी मागावर असताना गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाआधारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सागर बाळू राउत, वय ३१ वर्षे, रा. कुंकुगल्ली, करमाळा, ता करमाळा, जि सोलापुर याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर आरोपी शोध कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना झाले, गोपनिय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा करमाळा शहरात असलेबाबत माहीती मिळाली असता सदर माहीतीच्या अनुषंघाने बातमीतील नमुद ठिकाणी पथक गेले असता आरोपी मिळुन आल्याने त्यास पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याची कबूली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले. आरोपी मजकूर याचे ताब्यातून २४,०००/- रूपये किंमतीचे वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ/ ऐ. एस. मोहोळकर हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, श्री. प्रिमत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अंजना कृष्णा व्ही. एस. (भा.पो. से.), करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकॉ रविराज गटकुळ, पोकॉ मिलींद दहीहांडे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ येवले पोकों भराटे, पोकॉ/ रंदिल, पोकॉ खोटे तसेच सायबर पो ठाणे कडील पोहेकॉ / २२२ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे