Breaking
ब्रेकिंग

एस टी ड्रायव्हर चा प्रवाशांच्या जीवाशी खेळ ; गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलण्यात व्यस्त

0 8 6 5 1 0

एस टी ड्रायव्हर चा प्रवाशांच्या जीवाशी खेळ ; गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलण्यात व्यस्त

प्रतिनिधी : समीर तांबोळी

नगर : एस टी बस चालवताना मोबाईलवर बोलणे काही ड्रायव्हरांचे नित्याचेच झाले आहे . पण त्यामुळे प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण होवु शकतो या गोष्टीचा बहुतेक त्यांना विसर पडलेला दिसतोय . अशीच काहीशी घटना नंदुरबार – पुणे या गाडी नं . MH 15 JW 2483 बाबतीत घडलेली दिसते . दि . 29 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी राहुरी परिसरातून गाडी येत असता सदर एसटी बस चा ड्रायव्हर बराच वेळ फोन वर बोलताना प्रवाशांनी पाहिले . त्याला त्याबद्दल सांगितले . तरीही ड्रायव्हर गाडी चालवत मोबाईलवर बोलत राहिला .
गाडीच्या आतील आरशात ड्रायव्हर नंतर मोबाईल हाताळताना व स्पीकर ऑन करून बोलताना दिसत आहे .

सदर घटना ही एवढी एकच घडलेली नाही तर असे प्रसंग वारंवार घडताना दिसतात . यामुळे मात्र प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो . काही ठिकाणी तर अपघात घडलेल्या घटना ही आपण पाहतो .संबंधीत एसटी महामंडळ प्रशासनाला प्रवाशांची एकच विनंती आहे कि, प्रवाशांच्या जीवाशी खेळु नका अन्यथा प्रवाशांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. सदर घटनेने मात्र प्रवाशी संतप्त झाल्याचे नागरिकांनी सांगितले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे