नवयुवकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कॉ. बापूसाहेब भापकरांचे कार्य तडीस न्यावे – – श्री. रामचंद्रजी दरे
"कॉ. बापूसाहेब भापकर वक्तृत्व स्पर्धेचा समारोप

नवयुवकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कॉ. बापूसाहेब भापकरांचे कार्य तडीस न्यावे – – श्री. रामचंद्रजी दरे
“कॉ. बापूसाहेब भापकर वक्तृत्व स्पर्धेचा समारोप
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
अ.नगर ” कॉ. बापूसाहेब भापकर यांचे सामाजिक योगदानांस तोड नसून अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाच्या रोपटयापासून ते वटवृक्षात रुपांतर करण्यात त्यांचा अमूल्य वाटा आहे. नवयुवकांनी कॉ. बापूसाहेब भापकर यांचे विचार आणि कार्य यांचा आदर्श घेऊन सामाजिक जबाबदारी पार पाडली तर राज्य आणि राष्ट्राचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच युवकांनी व्यसनापासून दूर राहून स्वनिर्मितीत भर दयावा, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे अध्यक्ष मान. श्री. रामचंद्रजी दरे यांनी येथिल न्यू लॉ कॉलेज आयोजित १९ व्या कॉ. बापूसाहेब भापकर आंतर महाविदयालयीन राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात केले. यावेळी अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर हे होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे, प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे, प्रा. विजयकुमार शिंदे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मान. डॉ. विवेक भापकर म्हणाले की, “न्यू लॉ कॉलेज गत एकोणीस वर्षापासून सातत्याने आणि यशस्वीरित्या ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा कॉ. बापूसाहेब भापकर यांचे विचार आणि आचार संपूर्ण महाराष्ट्रात रुजवत आहे, याचा मला अभिमान वाटतो. या वक्तृत्व स्पर्धेतून चांगले वक्ते आणि विचारवंत तसेच वकिली व्यवसायासाठी आवश्यक असलेले वक्तृत्व गुण विदयार्थ्यांमधून घडतात, ही आनंददायक बाब आहे.”
स्वागत व प्रास्ताविक करताना प्राचार्य एम. एम. तांबे यांनी वक्तृत्व स्पर्धा तसेच महाविदयालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी स्पर्धकांनी तसेच परीक्षक प्रा. डॉ. मच्छिंद्र मालुंजकर आणि प्रा. सोनवणे ए. एस. यांनी मनोगत व्यक्त केले. अतिथी परिचय प्रा. ए. ए. म्हस्के यांनी केले तर बक्षिस वितरण वाचन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे कांडेकर यांनी केले. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध महाविदयालयातील २५ संघांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे प्रा. अनुराधा मते, प्रा. अतुल म्हस्के, प्रा. डि. बी. मोरे, ग्रंथपाल सौरभ साबळे, प्रा. आर. डी. भवाळ, अधिक्षक सौ. हेमा कदम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महाविदयालयातील विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल –
प्रथम पारितोषिक रोख रक्कम रु.
७००१/- डॉ. विवेक भापकर, विश्वस्त यांच्या तर्फे कॉ. बापुसाहेब भापकर यांचे स्मृतिप्रित्यर्थ करंडक
१. श्री. यश रविंद्र पाटील
२. श्री. अभय कृष्णकांत आळशी मुंबई विदयापीठ, मुंबई
व्दितीय पारितोषिक रोख रक्कम रु.
५००१/- श्री. रामचद्रंजी दरे, विश्वस्त,
अ.जि.म.वि.प्र. समाज यांच्या तर्फे के. हरिभाऊ दरे यांचे स्मृतिप्रित्यर्थ करंडक
१. कु. संपदा मच्छिद्र लांडगे
२. कु. हुमेरा अन्सारी
न्यू लॉ कॉलेज, अहिल्यानगर
३ .तिसरा पारितोषिक रोख रक्कम रु.
४००१/- प्रा. डॉ. एम. एम. तांबे यांच्या तर्फे कै. मल्हारी तांबे यांचे स्मृतिप्रित्यर्थ
१. अनिकेत रामा आणारे
२. रोहन जोतीराव कवडे
४ . चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम रु. १५०१/- प्रा. डॉ. आर. बी. दुसुंगे यांच्या तर्फ के. सो. मनिषा दुसुंगे यांचे स्मृतिप्रित्यर्थ दोन उत्कृष्ठ वक्ता दोन विदयार्थीनींना विभागून रोख बक्षीस व चषक
उत्तेजनार्थ बक्षीस रोख १००१/- कॉ. एकनाथराव भागवत स्मृतिप्रित्यर्थ कॉ. भाऊसाहेब थोटे यांचे तर्फे
कला, वाणिज्य महाविदयालय, पुणे
कु. पुजा अनिल कोरडे न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, शेवगाव
कु. कार्तिकी रामहरी पवार रेसिडेन्शिअल ज्यु. कॉलेज, अ.नगर
श्री. अमोल रामचंद्र गोळे सौ. निर्मलाताई थोपटे कॉलेज, भोर पुणे



