Breaking
ब्रेकिंग

वाळकी गटात महायुतीचा झेंडा फडकवा : ना . विखे

साकळाई योजनेच काम लवकरच सुरू होणार असल्याचा दिला शब्द

0 7 6 9 3 2

वाळकी गटात महायुतीचा झेंडा फडकवा : ना . विखे

साकळाई योजनेच काम लवकरच सुरू होणार असल्याचा दिला शब्द

वाळकी / प्रतिनिधी (दादासाहेब आगळे) 

राज्यात भाजपा महायुतीचे सरकार चांगले काम करत आहे . राज्यातील लोकोपयोगी विकास कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले आहे . नगर – श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणारी ‘ साकळाई ‘ योजना पुर्ण करणार असून आगामी काही दिवसातच योजनेच्या कामाचा शुभारंभ करणार असल्याचे पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांना स्पष्ट केले . जिल्हा परिषदेच्या वाळकी गटात गेल्या पंधरा वर्षात रखडलेली विकास कामे मार्गी लावायची असतील तर वाळकी गटातील जनतेनी लोकसभा निवडणुकीत केलेली चुक पुन्हा करू नका . वाळळी गटात भाजपा महायुतीचा झेंडा फडकवा असे प्रतिपादन पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले .
पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील यांचा नियोजित जामखेड दौरा असताना त्यांनी वाळकी ( ता . नगर ) येथे भेट दिली . भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात वाळकी गटातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते .
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग , जेष्ट नेते विनायक देशमुख , बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे , पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे , माजी सभापती अभिलाष घिगे , रेवणनाथ चोभे , संतोष म्हस्के , तालुकाध्यक्ष दिपक कार्ले , राम पानमळकर , दादासाहेब दरेकर , सरपंच शरद बोठे , धर्मराज शैक्षणिक संस्थेचे सचिव विक्रम कासार , संजय गिरवले , रमेश भांबरे , प्रशांत गहिले , यासीनभाई शेख , प्रभाकर बोरकर , दादाभाऊ चितळकर , भाऊसाहेब लांडगे , बाजीराव हजारे , अशोक कोकाटे , ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे , विकास कासार , राम कासार , महादेव कासार , प्रथमेश भालसिंग , गणेश धोंडे , भाऊसाहेब भालसिंग , संदीप बोठे , अक्षय भालसिंग , दादासाहेब बोठे , गणेश भालसिंग , संदीप जाधव , विक्रम भालसिंग , शिवाजी लोखंडे , बाळासाहेब जाधव , आदिंसह वाळकी गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी ना . विखे पाटील म्हणाले की , आगामी होणाऱ्या जिल्हापरिषद , पंचायत समिती निवडणूकीत भाजपा महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे . लोकसभेला झालेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ देऊ नका . ‘ साकळाई ‘ योजना मार्गी लागणारच आहे . वाळकी गटात परिवर्तन होणे गरजेचे असून गटातील जनतेने भाजपाच्या पाठीमागे उभे रहावे . विकास कामे मार्गी लावण्याची जबाबदारी असेल असे ना . विखे यांनी सांगितले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे