नालेगाव येथे मोफत नेत्रतपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन
२५ नोव्हेंबर रोजी होणार भव्य शिबिर
प्रतिनिधी : आसावरी वायकर
अहिल्यानगर : स्व. सौरभ चौरे प्रतिष्ठान, मायाभाई फ्रेंड सर्कल, फिनिक्स फाऊंडेशन, बुधराणी हॉस्पिटल व नमो बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि . २५ नोहेंबर २०२४ रोजी स्व. सौरभ चौरे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणार्थ पुण्यातील प्रसिध्द बुधराणी हॉस्पिटल यांचे मोफत मोतीबिंदू निदान व नेत्रतपासणी शिबीर आणि अष्टविनायक ब्लड बँकेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत सातपुते तालीम शेजारी, नालेगाव अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले आहे . तरी सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे .
सदर शिबिरा अंतर्गत मोफत नेत्रतपासणी होणार असून डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी गरज असल्यास मोफत शस्त्रक्रियेची सोय करण्यात आली आहे .
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे .कोरोना काळापासून सर्व ठिकाणी रक्त संकलनाचा तुटवडा आहे . तरी नागरिकांनी रक्तदाना साठी उत्स्फूर्त पणे सहभाग घ्यावा आणि रक्तदान करावे ज्यामुळे गरजु रुग्णांना जीवनदान मिळणार आहे .
अष्टविनायक ब्लड बँकेच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले असून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
सदर मोफत शिबिरासाठी नावनोंदणी साठी संपर्क:
अभिजित भगत ९६८९५८१७३७,
डॉ. संजय वायकर ९८२२५०४८२२,
किरण रोकडे ८३६९३८२५२५