Breaking
ब्रेकिंग

किसान कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर*

0 8 6 5 3 6

*किसान कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर*

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

पारोळा : किसान कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तसेच शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डी. व्ही. देवरे सर यांनी भूषविले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक के. पी. पाटील सर उपस्थित होते. तसेच युनिक अकॅडमी जळगाव चे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नरेंद्र पाटील व प्रा. सुनील देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रमुख वक्त्यांनी ज्युनिअर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी विकासासाठी दिल्या जाणाऱ्या योजना यासंदर्भात सखोल माहिती दिली.

त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट, पात्रता निकष, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे तसेच ऑनलाईन अर्ज प्रक्रियेतील टप्पे यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना, मुख्यमंत्री अनाथ विद्यार्थी शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजना, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या योजना याबाबत त्यांनी उपयुक्त माहिती दिली.

विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्र शासनातर्फे 15,000 पोलिस भरती प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले. या भरतीसाठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी, याबाबत मार्गदर्शन करताना दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन तसेच पुस्तक खरेदीसाठी प्रति विद्यार्थी 12,000 रुपयांचे अनुदान देण्यात येते, अशी माहितीही देण्यात आली.

प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, दररोज ठराविक अभ्यासाची सवय आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक वाचनसामग्री याचे महत्त्व पटवून दिले. तसेच विशेषतः एससी व एसटी विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेत उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा तयारीत पुढे जाण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक शशिकांत पाटील, प्रशांत मेश्राम, शैलेश पाटील, अनिल पवार, मनोज रत्नपती, नितीन पाटील आणि डॉ. संदीप पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

या मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उर्जा निर्माण झाली असून, शासनाच्या शिष्यवृत्ती योजना व स्पर्धा परीक्षा संधींबाबत जागरूकता वाढली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे