Breaking
ब्रेकिंग

करमाळा पोलिस पथकाची उस वाहतुक ट्रॅक्टर चालकांची तपासणी

0 8 9 7 4 6

करमाळा पोलिस पथकाची उस वाहतुक ट्रॅक्टर चालकांची तपासणी

प्रतिनिधी : समीर तांबोळी

करमाळा : महाराष्ट्रात सध्या गाळप हंगामात ऊस वाहतूक ट्रॅक्टर चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ऊस तोडुन कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉली महत्त्वाची भूमिका बजावतात.

याच पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक हे दारू पिऊन वाहतूक करत आहेत का ? नियम तर मोडत नाहीत ना ? यासाठी करमाळा पोलीस पथकाने वाहतुकीच्या रस्त्यांवर नियमांप्रमाणे काही ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफलेक्टर लावून व चालकाची तपासणी करून आवश्यक सूचना दिल्या . चालकांची ऊस वाहतूक ही विहाळ येथील भैरवनाथ शुगर फॅक्टरी तसेच राशिन येथील अंबालिका कारखान्या साठी होत असताना सदर तपासणी करण्यात येवून आवश्यक सुचना चालकांना देण्यात आल्या .

क्षमता आणि वजन:

आधुनिक पद्धतीने एका ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉली किंवा ट्रेलरमधून १० टन ते अगदी ४५ टनांपर्यंत उसाची वाहतूक केली जाते. जास्त हॉर्सपॉवर (३५ ते ७५ HP किंवा अधिक) असणारे ट्रॅक्टर जसे की Mahindra, Indo Farm इत्यादींचा वापर ऊस ओढण्यासाठी आणि शेतात काम करण्यासाठी केला जातो.

वाहतुकीचे नियम व सुरक्षा:

अपघातांच्या धोक्यामुळे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टीव्ह टेप्स लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसेच अरुंद रस्त्यांवर दोन ट्रॉली जोडून होणारी वाहतूक धोकादायक ठरते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 7 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे