Breaking
ब्रेकिंग

जागृती वाचनालय वाचन चळवळीसाठी करत असलेले कार्य कौतुका स्पद पत्रकार देविदास देसाई

0 3 9 0 5 1

जागृती वाचनालय वाचन चळवळीसाठी करत असलेले कार्य कौतुका स्पद पत्रकार देविदास देसाई

जिल्हा प्रतिनिधी :   जावेद शेख

बेलापूर खुर्द.. येथील जागृती वाचनालयात दिवाळीनिमित्त अनेक दर्जेदार दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले त्याचे उद्घाटन देविदास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी वरील मनोगत व्यक्त केले. अनेक वृत्तपत्र वाचकांसाठी दिवाळी अंक काढत दिवाळी अंक ही सुशिक्षित आणिवाचन प्रेमी प्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. दिवाळी फराळ इतकेच दिवाळी अंकांना महत्त्व आहे त्यामध्ये लोकांचे मनोरंजन व प्रबोधन होते. खेड्यामध्ये दिवाळी अंक पाहायला मिळणे दुरापस्त असते अशा गावांमध्ये दर्जेदार दिवाळी अंक प्रदर्शन करून गाव खेड्यातील लोकांना वाचनाची एक मेजवानी मिळणे ही बाब अतिशय चांगली आहे. वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक बाबासाहेब शेलार यांच्या संकल्पनेतून दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले त्याबद्दल श्री देसाई यांनी त्यांचे कार्याची कौतुक केले. याप्रसंगी प्रभारी सरपंच एडवोकेट दीपक बारहाते यांनी वाचनालयाला सर्वतोपारी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी संचालक द्वारकानाथ पाटील बडदे हे होते. यावेळी कवी आलम भाई शेख यांनी मनोगत व्यक्त करून सामाजिक सलोख्यावर एक मेरा भी एक गाव नावाची कविता म्हणून ती चाळीस वर्षांपूर्वीच्या गावाच्या आठवणी जागा केल्या. टीडीएफचे जिल्ह्याचे नेते प्रशांत होऊन सर यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमात तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून सोमनाथ पाटील वाकडे यांची तर बीएम पुजारी साहेब यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा वाचनालय व गावकऱ्यांचे वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहयोग मंचेचे सर्वस्वी पुंजारे सुपेकर सर बाबुराव फुंदे किशोरविंद वन ट्रस्टचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव भगत विश्वकर्मा भाजपा आघाडीचे तालुकाध्यक्ष विलासराव भालेराव धनंजय हरदास श्री मधुकर पुजारी सर भाईजान पठाण सुनील बडदे अण्णासाहेब शेलार इत्यादी सह अनेक नागरिक उपस्थित होते.. सदर दिवाळी अंक सर्वांसाठी वाचनालयात वाचायला मोफत आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाबासाहेब शेलार यांनी केले.. याप्रसंगी उद्घाटक व पत्रकार देविदास देसाई यांचा वाचनाच्या वतीने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून सत्कार करण्यात आला गावकरी मंडळीचे गुलाब पुष्प देऊन दिवाळीनिमित्त स्वागत करण्यात आले यावेळी अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय संघावर विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल गावकरी व सहयोग मंडळ वतीने अध्यक्ष श्री बाबासाहेब शेलार यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे