Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी सदफ पटेलची निवड

0 3 9 0 3 1

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी सदफ पटेलची निवड

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नुकतेच पुणे येथे दिनांक ७ ते १० नोव्हेंबर  २०२४ दरम्यान ३४ वी राज्यस्तर स्केटिंग रोलर हॉकी व ईनलाईन हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत टिम स्पीड स्केटिंग ॲकेडमीची खेळाडू सदफ पटेल ही सहभागी झाली होती . स्पर्धे दरम्यान निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक उत्कृष्ठ राष्ट्रीय आंतर-राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यावेळी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने ऑबझर्वर हरसिमरण सिंग उपस्थित होते.

रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया या एकमेव मान्यता प्राप्त संघटनेच्या वतीने दि. ०४ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान कोईमतुर, तमिळनाडू. येथे राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत. सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघात सदफ फातीमा महंमद शकील पटेलची निवड झाली आहे. सदफ पटेल गत पाच वर्षा पासुन म.न.पा विभागीय कार्यालय बुरुडगाव रोड येथे टिम स्पीड स्केटिंग ॲकेडमी येथे अद्ययावत प्रशिक्षण घेत असुन राष्ट्रीय खेळाडु श्री सतिष गायकवाड यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन तीला लाभत आहे. कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल ईयत्ता आठवीची विद्यार्थीनी असुन यापूर्वी तीने अनेक स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे .
सदफ पटेल आर्मीमध्ये कार्यरत असलेले शकील पटेल यांची मुलगी आहे.

सदफच्या निवडीबद्दल मा . उपमहापौर गणेशजी भोसले, जिल्हा संघटनेचे सचीव असिफ बाबुलाल शेख व संघटनेच्या वतीने पुढिल स्पर्धेस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे