ब्रेकिंग
शेतकरी जगला तरच देश जगेल! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्या – प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सर यांची मागणी

0
9
1
0
9
1
शेतकरी जगला तरच देश जगेल! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्या – प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सर यांची मागणी
अहिल्या नगर: जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस, कांदा पिके करपली. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरे चारा-पाण्याविना उपाशी. शेतकरी प्रेमी, पोलीस क्राईम न्यूज ब्युरो चीफ प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी अहिल्या नगर व पालक मंत्री यांना ई-मेलद्वारे कळकळीची विनंती केली. मागणी: 1. भरीव आर्थिक मदत 2. पीक विमा तात्काळ जमा करा 3. कर्जमाफी / वसुलीला स्थगिती 4. चारा छावण्या व टँकर सुरू करा.
*बनसोडे सरांनी आपले पत्रात पुढे असेही म्हणाले की, मी शेतकरी पुत्र असल्याने मला शेतकऱ्यांच्या व्यथा माहिती आहे. शेतकरी जगला तरच देश जगेल. अशी ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
0
9
1
0
9
1



