चितळेरोड वरील महाकाल ग्रुपच्या वतीने श्रावण मास पूजा व भंडारा संपन्न

चितळेरोड वरील महाकाल ग्रुपच्या वतीने श्रावण मास पूजा व भंडारा संपन्न
विशेष प्रतिनिधी : महेश कांबळे
अहिल्यानगर -शहरात दरवर्षी चितळे रोडवरील महाकाल ग्रुपच्या वतीने हिंदूंचा पवित्रा श्रावण महिन्यात महाकाल ग्रुपच्या वतीने भंडाऱ्याचे (महाप्रसाद)व हिंदवी शौर्य या ढोल पथकाने पारंपारिक पद्धतीने वादन करण्यात आले.तसेच महाकाल महादेवाची महाआरती करण्यात आली.यावेळी महाकाल ग्रुपचे सुमित धेंड,रवी दंडी,राजू इगे,रोहिदास बुरम, शंकर जिंदम,अक्षय वल्लाकट्टी, विशाल ठाकूर,सुनील जाधव, स्वप्निल खोडदे,वेदांत येमुल,यश सब्बन,रोहित गुगळे,सचिन शिरसाट,यश आडेप,प्रणव गुंटूक, अभिजीत येनगंदुल,श्रीनिवास श्रीगादी आदींसह शहरातील महाकाल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित धेंड म्हणाले,आम्हीउज्जेन च्या महाकाल चे भक्त असून अहिल्यानगर शहरात महाकाल महादेवाचे भक्त मोठ्या संख्येने आहेत.पवित्र श्रावण महिन्यात सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने भोलेनाथाची भक्ती केली जाते. महाकाल ग्रुपच्या वतीने दरवर्षी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.महाकालची सामुदायिक आरती करून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येतो.
रवी दंडी म्हणाले श्रावण मासात भगवान शिवाचे खूप महत्त्व आहे हिंदू कथेनुसार, देव आणि असुरांमधील संघर्षात पाण्यातून विष बाहेर पडले. मानवजातीला वाचवण्यासाठी भगवान शिवाने सर्व विष पिऊन टाकले. ही घटना श्रावण महिन्यात घडली. त्यामुळे भगवान शिवाच्या शरीराचे तापमान खूपच वाढले. त्यानंतर भगवान शिवाने त्यांच्या डोक्यावर चंद्र धारण केला, ज्यामुळे त्यांचे तापमान कमी झाले आणि सर्व हिंदू देवतांनी भगवान शिवावर गंगाजल ओतले, जे आजही भक्त पाळतात.
असेही म्हटले जाते की, भगवान इंद्राला भगवान शिवाचे तापमान कमी करायचे होते आणि म्हणूनच पाऊस जास्त पडला. त्यामुळे भगवान शिव शांत झाले आणि त्यांना आराम मिळाला. तेव्हापासून, भगवान शिवाचा सन्मान केला जातो आणि श्रावण महिन्यात, विशेषतः सोमवारी, भगवान शिवावर पाणी ओतले जाते.




