Breaking
ब्रेकिंग

राहुरीत ब्रह्माकुमारीज च्या विशाल रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद ; पोलीस अधिकाऱ्यांनी केले रक्तदान

0 8 6 7 0 3

राहुरीत ब्रह्माकुमारीज च्या विशाल रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद ; पोलीस अधिकाऱ्यांनी केले रक्तदान

राहुरी तालुका जावेद शेख

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या अठराव्या पुण्यतिथी निमित्त राहुरी येथील राजयोग भवन येथे आज शुक्रवार दि. 22 ऑगस्ट रोजी विशाल रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले होते .
या शिबिराचे उद्घाटन राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविण क्षीरसागर , अहिल्यानगर येथील जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. विलास मढेकर तसेच पत्रकारांच्या उपस्थितीत करण्यात आले .
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की , अध्यात्म आणि आत्मा यांचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच राजयोग भवन यांनी रक्तदान शिबिराची जोड दिली आहे . जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. मढीकर म्हणाले की , रक्तदाता हा रक्तपेढीचा आत्मा असतो . रक्तदानाने रुग्णांना जीवनदान मिळते आणि ही रक्तदान शिबिरे आयोजित करणारे संयोजक यांचे मोठे योगदान असते .
ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. क्षीरसागर , पत्रकार वसंतराव झावरे , पत्रकार प्रसाद मैड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .
राजयोग भवनच्या नंदादीदी यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली . त्यांनी सांगितले की, राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विश्वबंधुत्व दिवस मानला जातो . यानिमित्ताने देशभरातील 6000 सेवा केंद्रांवर महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे .
यावेळी रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व प्रकाशमनी दीदी ची स्मृति असलेले कप देण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांना सन्मानचिन्ह देण्यात आले .
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे , गणेश वाघमारे , डॉ. प्रविण क्षीरसागर , डॉ. विलास मढीकर , पत्रकार वसंतराव झावरे , राजेंद्र परदेशी , जावेद शेख, आप्पासाहेब मकासरे तसेच जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. मुनोत, पवळ सिस्टर , मेघा शिंदे , प्रीती चिपाडे , खरपुडे , ब्रह्माकुमारीज च्या ब्रह्मा कुमारी नंदा दीदी, पूनम दीदी, मंगल दीदी, तसेच ब्रह्मा कुमार महेश भाई, बाळू भाई, आर, टी, ओ, संजय गोसावी रवि भाई, संदीप भाई, युगंधारा ग्रुपच्या विद्या करपे , संगीता हारदे व ओम शांति परिवार उपस्थित उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे