Breaking
ब्रेकिंग

रुईछत्तीसी ग्रामस्थांचे वेश्याव्यवसाय विरुद्ध दोन दिवसीय उपोषणाला यश

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण सोडले

0 7 6 9 4 3

रुईछत्तीसी ग्रामस्थांचे वेश्याव्यवसाय विरुद्ध दोन दिवसीय उपोषणाला यश

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण सोडले

नारायणडोह /  प्रतिनिधी : रफिक शेख

नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील वेश्याव्यवसाय डान्सबार कला केंद्र लेडीज सर्विस सेंटर अशा बेकायदेशीर व्यवसाय रुईछत्तीसी गावांचे नाव बदनाम झाले होते ‌.तसेच रुईछत्तीसी येथील वेश्याव्यवसाय डान्सबार कला केंद्र मुळे स्थानिक महिला मुली छेडछाड प्रकार वाढ झाली होती ‌.रुईछत्तसी येथील सिनिअर ज्युनिअर कॉलेज मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते ‌. रुईछत्तीसी येथील काॅलेज तरुण या वेश्याव्यवसाय विळख्यात अडकण्यात सुरुवात झाली होती. आज दि‌‌ .१० फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी या अमरण उपोषणाची दखल घेऊन रुईछत्तीसी उपोषण स्थळी उपोषणकर्ते गावातील महिला मुली ग्रामस्थ सर्व समस्या जाणून घेतल्या रुईछत्तीसी गावांची शांतता सुखशांती नष्ट झाली गावातील महिलांनी आपल्या या वेश्याव्यवसाय विळख्यात आमचं गाव बाहेर काढण्यासाठी आता टोकाचे पाऊल उचलले वेळ आल्याची खंत अनेक महिला भगिनी पोलिस अधीक्षक यांच्या समोर मांडली ता वेश्याव्यवसाय डान्सबार कला केंद्र विरुद्ध आवाज उठवलेल्या तरुणांना हे अवैध व्यावसाईक जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याचे संभाषण रेकॉर्ड ऐकण्यात आले. उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणावर महिला ग्रामस्थ उपस्थित लक्षणीय होती ‌.सदर व्यवसाय पाठीशी घालण्याचे काम नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक गिते यांनी केल्याचे ग्रामस्थ आरोप व पुरावे सुद्धा दाखवल्याने पोलीस अधीक्षक या प्रकारात दिलगिरी व्यक्त केली आज पासून तीन दिवसांत रुईछत्तीसी परीसरात अवैध वेश्याव्यवसाय विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे ‌. सदर उपोषणाची दखल घेऊन प्रतिनिधी स्वरुपात गावातील एका उपोषण कर्ते लिंबू पाणी देऊन सदर उपोषण सोडण्याची विनंती करून कडक कारवाईचे आश्वासन दिले. या वेळी सागर जगदाळे, प्रविण गोरे,भलभिम दरदंले, किरण भापकर, कृष्णा गोरे, मयुर गोरे, विशाल गोरे, सोमनाथ गोरे, आकाश गोरे, संदीप ब़ोठे, सचिन भवर,रवि भापकर, विलास लोखंडे , आदी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय भांबरे, मावळे परिवार,आशिष जगदाळे, लक्ष्मण खाकाळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

नगर तालुक्यातील रुईछत्तीसी पंचक्रोशीतील अनेक ठिकाणी आंबट शौकीना सोशल मीडियावर माध्यमातून दररोज नव नवीन तरुणांनी फोटो शेअर करून या वेश्याव्यवसाय आकर्षित केले जाते,सदर अवैध वेश्याव्यवसाय कोणाचे आशीर्वाद पाठबळ हे सर्व धंदे जोरदार सुरू आहेत हि चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली आहे अनेक ग्रामस्थांनी सदर व्यवसायस पोलीस पाठबळ असल्याचे आरोप केला आहे ‌.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे